शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

एका विचाराने प्रश्न सोडवले तरच लोकशाही टिकेल, शरद पवार यांचं मोठं विधान

By अनंत खं.जाधव | Published: October 01, 2022 3:48 PM

Sharad Pawar: बॅ.नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता.आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे.जो घटक विकासापासून दूर असेल त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे तेथील प्रश्न एका विचाराने सोडवले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल

सिंधुदुर्ग: बॅ.नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता.आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे.जो घटक विकासापासून दूर असेल त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे तेथील प्रश्न एका विचाराने सोडवले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले 

ते शनिवारी वेंगुर्ले  येथील  बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार बाळाराम पाटील बॅ.नाथ पै याची नात आदिती पै शैलेंद्र पै, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पद्मश्री  परशुराम गंगावणे,  बॅ.नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी,व्हिक्टर डाॅन्टस अमित सामंत अर्चना घारे-परब पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे संजय पडते आदि उपस्थित होते.

पवार म्हणाले,जरी बॅ.नाथ पै लहान कुटुंबात जन्माला आले होते. वडिलांचे छत्र लहान पणीच हरपले आईने छोटी मोठी कामे करून या सात भावंडाना मोठे केले काहि अंतराने बॅ.नाथ पै बेळगाव येथे गेले तेथे त्यांनी स्वतंत्र संग्रामात भाग घेतला आणि तेथूनच बॅ.नाथ पै यांच्या कामाची सुरूवात झाली त्याचे सुरूवातीचे आयुष्य पूर्ण पणे सर्घषातून गेले नंतर  पुढे ते इंग्लंड येथे गेले आणि तेथील काहि आंदोलनात भाग घेतला अभ्यास केला त्यानंतर ते भारतात आरे तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले पण पराभूत झाले पण ते मागे हटले नाहीत.पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रीय सहभाग घेतला राजापूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आज ही आपण पुस्तक रुपाने वाचत आहोत.

बॅ.नाथ पै यांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास होता त्यांचे संसदेतील विचार ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही हे स्वता थांबायचे ते टिका करायचे पण टिकेत व्यक्तिगत पणा नव्हती समृद्ध लोकशाही प्रणाली टिकण्यासाठी मार्गदर्शन होते.असेही पवार यावेळी म्हणाले. मंत्री  केसरकर म्हणाले,शरद पवार हे सर्वाचे  प्रेरणा स्थान आहेत बॅ.नाथ हे समाजवादी विचार सरणीचे होते समाज उन्नती साठी ते नेहमी  काम करायचे  बॅ.नाथ पै च्या स्मृती कायम राहिल्या पाहिजेत माझ्या राजकीय जडण घडणीत  पवार यांचा मोलाचा वाटा असून शांतता आणि संयम हे त्यांनीच आम्हाला शिकवल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

खासदार राऊत म्हणाले,मी संसदेत असतो तेव्हा मला मला बॅ.नाथ पै यांच्या मतदारसंघातून येत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच या  मतदारसंघाला परंपरा आहे त्यामुळे मतदार संघाला कुठे ही गालबोट लागू नये म्हणून माझा प्रयत्न असतो बॅ.नाथ पै याची गाजलेली भाषणे आम्हाला पुस्तकांतून अनुभवायला मिळावीत यासाठी लवकरच संसदेतील भाषणे पुस्तक येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. विठ्ठल याळगी यांनी नाथ पै यांच्या आठवणी जागवल्या यात नाथ  पै हे नाव घेतल कि याळगी घरण्याचे नाव कायम येत येते असे सांगत नाथ पै हे  साधे व्यक्तीमहत्व होते बेळगाव येथे सायकल वरून फिरत होते.

कधी ही त्याच्यात बडेजाव आला नाही त्यांना जंगलात शिकारीची आवड होती वाचनावर त्याचे विशेष प्रभुत्व होते 1960 सालीच बॅ.नाथ पै यांनी कोकण रेल्वे चे स्वप्न बघितल्याचे त्यांनी सांगितले ते नंतर सत्यात उतरले  महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले.यावेळी आदिती पै यांच्यासह आमदार बाळाराम पाटील यांनी ही आपले विचार मांडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdemocracyलोकशाहीIndiaभारतNCPराष्ट्रवादी काँग्रेस