बांदा : बांदा पंचक्रोशीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेर्ले-कापईवाडी येथील महेश मोहन धुरी यांच्या मातीच्या घराची भिंत कोसळली. यात धुरी कुटुंबीयांचे सुमारे २ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. तलाठी बोरकर यांनी पंचनामा करून याबाबतची नोंद तहसील कार्यालयात केली आहे.गेले चार-पाच दिवस मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. शेर्ले-कापईवाडी येथील महेश धुरी यांच्या मातीच्या घराची एका बाजूची संपूर्ण भिंत बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यावेळी धुरी यांचे आई, वडील व पत्नी घरातच होती. तर त्यांचा मुलगा भिंत कोसळली त्याच बाजूने घरानजीक असलेल्या शौचालयात होता. तो या दुर्घटनेमधून बालंबाल बचावला.तलाठी दर्शन बोरकर यांनी घटनास्थळाला भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. या दुर्घटनेत धुरी कुटबीयांचे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी राजन तेली, माजी सावंतवाडी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी यांनीही भेट देऊन पाहणी केली.छपराची मोडतोड, छप्पर अधांतरीचघटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, भाजपा तालुका सरचिटणीस दादू कविटकर, शेर्ले सरपंच उदय धुरी, विकी केरकर, पोलीस पाटील विश्राम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. भिंत कोसळल्यामुळे छपराची मोडतोड झाली असून, छप्पर सध्या अधांतरीच आहे. घरातील पंखे, लाईट फिटींग, विहिरीवरील पंप यांचे नुकसान झाले.
शेर्लेत घराची भिंत कोसळली, अडीच लाखांची हानी : बांदा पंचक्रोशीला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:05 PM
बांदा पंचक्रोशीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेर्ले-कापईवाडी येथील महेश मोहन धुरी यांच्या मातीच्या घराची भिंत कोसळली. यात धुरी कुटुंबीयांचे सुमारे २ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. तलाठी बोरकर यांनी पंचनामा करून याबाबतची नोंद तहसील कार्यालयात केली आहे.
ठळक मुद्देशेर्लेत घराची भिंत कोसळली, अडीच लाखांची हानी बांदा पंचक्रोशीला पावसाने झोडपले