शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

सर्किट बेंचसाठी शिवसेना आग्रही

By admin | Published: August 24, 2016 10:15 PM

उद्धव ठाकरे : खंडपीठ कृती समितीने घेतली मुंबईत भेट

कोल्हापूर : उच्च न्यायालयाने दहीहंडीबाबत निर्णय घेण्याऐवजी सर्किट बेंचचा प्रश्न निकाली काढला असता तर बरे झाले असते. हा प्रश्न समाजाचा आहे, स्वस्थ बसू नका, असा खंडपीठ कृती समितीला सल्ला देत कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठी शिवसेना आग्रही राहील, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून वकील करीत आहेत. चार वर्षांत आंदोलनाने चांगलीच धार घेतली आहे. याचाच भाग म्हणून यापूर्वी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणे, अशी विविध आंदोलने वकिलांनी केली. या मागणीसाठी १९ आॅगस्ट २०१६ ला सहा जिल्ह्यांतील वकिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. खंडपीठ कृती समितीने सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी आंदोलनाची माहिती देऊन मोहित शहा यांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने फक्त कोल्हापूरसाठी ठराव करावा, तसेच बजेटमध्ये खंडपीठ इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी करून निवेदन दिले. त्यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सर्किट बेंचसंबंधी कृती समितीची बैठक घ्यावी, अशी विनंती केली. त्यावर फडणवीस यांनी चार दिवसांत बैठक बोलावू, असे आश्वासन दिले. ठाकरे यांनी कृती समितीला सर्किट बेंचचा प्रश्न समाजाचा आहे; स्वस्थ बसू नका, असा सल्ला देत कोल्हापूर सर्किट बेंच होण्यासाठी शिवसेना आग्रही राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी मंत्री शिंदे यांना मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. खंडपीठ कृती समितीचे सदस्य व जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रशांत चिटणीस, अभिजित कापसे, रणजित गावडे, राहुल बंदोडे, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव उपस्थित होते. सर्किट बेंचविषयी खंडपीठ कृती समितीने बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेजारी उपस्थित मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अ‍ॅड. प्रकाश मोरे, विवेक घाटगे, अभिजित कापसे, प्रशांत चिटणीस, प्रसाद जाधव, आदी उपस्थित होते.