शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 3:31 PM

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळ तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी या दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलनप्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर : नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच

कुडाळ : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळ तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी या दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.सोमवारी दुपारी कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, माजी सभापती राजन जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, योगेश धुरी, पावशी उपसरपंच दीपक आंगणे, कृष्णा तेली, राजू गवंडे, सुयोग ढवण व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करून प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे. नागरिकांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने केलेली इंधन दरवाढ चुकीची आहे, असे ते म्हणाले.भाजप सरकारला आश्वासनांचा विसरकेंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना ह्यअच्छे दिनह्ण पहावयास मिळाले नाहीत. कोरोना संकट काळातही सलग १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, असा टोला आमदार नाईक यांनी केंद्र सरकारला लगावला.सातत्याने होतेय दरवाढलॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने वाहनांचा वापर होऊन पेट्रोल, डिझेलची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, गेले १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत आहे. कोरोनाचे संकट देशावर अद्याप कायम असताना आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना ही इंधन दरवाढ म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Petrolपेट्रोलsindhudurgसिंधुदुर्ग