शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

पालपेणे शाळेत साकारतेय शिवचरित्र

By admin | Published: January 22, 2015 11:34 PM

अनोखा उपक्रम : छत्रपतींचा इतिहास भिंतीवर जिवंत झाला

मंदार गोयथळे - असगोली -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवरायांचा इतिहास हळूहळू लोप पावण्याची भीती निर्माण झाली असताना, गुहागर तालुक्यातील पालपेणेसारख्या एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी आपल्या इमारतीवरील भिंतीवर शिव छत्रपतींचे चरित्रचित्र साकारण्याचा विडा उचलला आहे.शृंगारतळी बायपास आरजीपीपीएल प्रकल्प मार्गावर, विस्तारलेल्या जागेमध्ये पालपेणे शाळा नं. २ची देखणी वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. या शाळेमधील मूळ चित्रकार असलेले पदवीधर शिक्षक राजू जानू सुर्वे यांनी शाळेमधील सुस्थितीत असलेली वर्गव्यवस्था व परिसर लक्षात घेऊन, मुख्याध्यापक मनोहर पवार यांच्यासमोर जुलै २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा चित्ररुप शिवचरित्राच्या रुपाने उभारण्याची कल्पना मांडली. त्याला मुख्याध्यापकांनी तत्काळ होकार देत, हा विषय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ घाणेकर व सर्व समितीसमोर ठेवून त्याला मंजूरी घेतली. हे चित्ररुप शिवचरित्र साकारण्याचा उद्देश समितीच्या सदस्यांसमोर स्पष्ट झाल्यावर, यासाठी अपेक्षित असणारा हजारो रुपयांचा निधी अनेकांनी भरसभेत देण्याचे मान्य केले. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही मागे राहिले नाहीत. त्यांनीही या कामासाठी आपल्याकडील हजारो रुपयांची देणगी शाळेकडे जमा केली. अशा प्रकारे आपल्या शाळेत शिवचरित्र साकारतेय ही संकल्पना हळूहळू गावामध्ये समजल्यावर विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांमधूनही शेकडो रुपयांची देणगी शाळेमध्ये जमा झाली. हे शिवचरित्र उभारण्यासाठी आवश्यक असलेली सुरुवातीची ठराविक रक्कम जमा झाल्यानंतर, डिसेंबर २०१४ पासून ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्याचे शाळेने निश्चित केले. यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक व चित्रकार सुर्वे यांनी पालपेणे गावातील स्थानिक चित्रकार भालचंद्र घाणेकर तसेच दापोलीमधील आपले चित्रकार मित्र प्रशांत कांबरे, प्रवीण वेळणस्कर व मंदार उजाळ यांच्याशी याविषयी बोलणे करुन, त्यांना द्यायचा मेहनताना निश्चित करुन कामाला सुरुवात केली. अशा प्रकारे गेल्या २०-२५ दिवसांत या सर्व चित्रकार मंडळींनी सुरुवातीला रस्त्यावरुन शाळेच्या २५ फुटाच्या मोठ्या भिंतीवर, १२ फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंतपणा असलेले चित्र साकारले. चित्र साकारण्याचे काम गुहागर व दापोलीमधील पाच चित्रकारांनी केले. यामधील सर्वांत लहान आकाराचे चित्र साकारण्यासाठी एक दिवस व रात्र एवढा वेळ, तर सर्वांत मोठे चित्र साकारण्यासाठी सुमारे चार ते पाच दिवस लागल्याचे यावेळी चित्रकार सुर्वे यांनी सांगितले. यासाठी मुख्याध्यापक पवार, शिक्षक सुर्वे, पदवीधर शिक्षक मेघा पवार, वैशाली गुरव, उपशिक्षक दीपक साबळे, अश्विनी नरखेडकर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.