कणकवली: तालुक्यातील शिवडाव लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी १२१ मीटर आहे. रविवारी मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे सोमवारी दुपारी २.४५ वाजता या धरणाच्या संचय पातळीपर्यंत पाणी साचल्याने सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.कणकवली तालुक्यात शनिवार पासून जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी तर पावसाने कहरच केला होता. त्यामुळे नदी, धरणे,नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. सोमवारी सकाळपासून तालुक्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, रविवारच्या जोरदार पावसाने शिवडाव लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाची पाण्याची पूर्ण संचय पातळी ओलांडली आहे.त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू
By सुधीर राणे | Published: July 08, 2024 5:15 PM