शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:10 AM

Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट  सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचे समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे. किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट  सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. 

सुशांत सिंग प्रकरण हे सीबीआयकडे आहे. ती तुमचीच तपास यंत्रणा आहे. मग जो तपास केला, तो सीबीआय जाहीर का करत नाही. ज्यांचा या प्रकरणाशी कोणताच संबध नाही. त्यांच्यावर आरोप करायचे बदनामी करायची. राणे ज्यांच्यामुळे घडले ज्या कुटुंबामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या बद्दल बोलताना जिभ थोडीतरी चाचरली पाहिजे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर निशाणा साधाला.

याचबरोबर, संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता, लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाही मग इथे येऊन का बोलता? जर किरीट सोमय्याच्या पत्रकार परिषदेला पुष्टी देण्यासाठी पत्रकार परिषद घेता. मग तुमच्यावर किरीट सोमय्यांनी त्यावेळेस केलेले आरोप खरे मानायचे का? तुम्ही त्यावेळेस सामोरे न जाता लोटांगण घालून तुम्ही भाजपामध्ये गेलात, असे दीपक केसरकर म्हणाले.

किरीट सोमय्या कोणाबद्दल बोलले, संजय राऊत कोणाबद्दल बोलले, त्यात तुम्ही का उडी घेता? असा प्रश्न दीपक केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, तुम्हाला बोलायचचं असेल तर लोकसभेत चांगला परफॉर्मन्स दाखवा असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात चांगले रस्ते आणले. नितीन गडकरी यांच्याकडील खाते राणेंना दिले. मात्र राणेंनी हे खाते मिळालेले असताना त्यांनी काही केले नाही. टीका करण्यासाठी हे खाते दिले आहे का? असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे Kirit Somaiyaकिरीट सोमय्या