शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

नेत्रदानातून दृष्टिहीनांना जग दाखवा

By admin | Published: October 07, 2016 9:41 PM

रवींद्र सावळकर : बांद्यात पाटेश्वर मंडळाचा नेत्रदान अभियानास प्रारंभ

बांदा : आज समाजात कित्येक लोक हे दृष्टिहीन असून, आपल्या नेत्रदानामुळे तेही सुंदर सृष्टी पाहू शकतात. मात्र, याविषयी समाजात जनजागृती होणे हे महत्त्वाचे आहे. पाटेश्वर नवरात्र मंडळाने मरणोत्तर नेत्रदानाचा केलेला संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद असून, समाजातील प्रत्येक डोळस व्यक्तीने ‘मरावे परी नेत्ररुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे मरणोत्तर नेत्रदानात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी येथे केले.बांदा आळवाडा येथील श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्यावतीने आयोजित मरणोत्तर नेत्रदान संकल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी सावळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सावंतवाडीचे नायब तहसीलदार शशिकांत जाधव, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, मंडळ अधिकारी उदय दाभोलकर, सरपंच मंदार कल्याणकर, तलाठी किरण गजीनकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, उपसरपंच बाळा आकेरकर, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाने विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. याआधी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान, स्त्री भू्रणहत्या विरोधात बेटी बचाओ जनजागरण अभियान असे उपक्रम राबविले आहेत.यावर्षी ‘नेत्रदान हे श्रेष्ठदान’ हा संकल्प हाती घेऊन मंडळातर्फे मरणोत्तर नेत्रदान हा संकल्प करण्यात आला. १0६ हून अधिक दात्यांनी नेत्रदानासाठी प्रतिसाद दिला आहे. यावेळी बांदा शहरातून पदयात्रा काढून नेत्रदानाबाबत समाज जनजागृती करण्यात आली. या पदयात्रेत बांदा शहरातील व्ही. एन. नाबर, खेमराज हायस्कूल व गोगटे-वाळके महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध फलक हाती घेऊन तसेच घोषवाक्यांच्या साहाय्याने समाजाला या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.मंडळाचे अध्यक्ष प्रीतम हरलमकर यांनी स्वागत केले. अन्वर खान यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष किशोर साळगावकर, सचिव प्रसाद केसरकर, ओंकार मालवणकर, मंगलदास साळगावकर, सचिन नाटेकर, माजी सरपंच अपेक्षा नाईक, ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, लक्ष्मी सावंत, जावेद खतीब, बाळु सावंत, चित्रा भिसे, साईराज साळगावकर, आदींसह बहुसंख्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)