कणकवली : कणकवलीचे ग्रामदैवत श्री स्वयंभू व श्री रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून झालेल्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री स्वयंभू मंदिरात सकाळ पासूनच भाविकानी दर्शन घेतले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती.कणकवलीतील 'टिपराची जत्रा ' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई तसेच जिल्ह्याबाहेर सध्या काम धंद्या निमित्त वास्तव्यास असलेले नागरिक आपल्या मूळ गावी म्हणजे कणकवलीत या उत्सवाच्या निमित्ताने दाखल झाले होते.श्री स्वयंभू मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच मंदिराचे सुशोभिकरणही करण्यात आले होते. मंदिराला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने नवस बोलणे, फेडणे तसेच ओटी भरण्यासाठी सुवासिनींबरोबरच भाविकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती .ढोल ताशांच्या गजरात रात्री ग्रामदैवतांच्या तरंगासह स्वयंभू मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली. तसेच यावेळी फटाक्यांची आतशबाजीही करण्यात आली. त्यानंतर दीपमाळेसह मंदिर परिसरात दिप लावण्यात आले. तसेच मंदिरातील इतर धार्मिक विधि झाल्यावर यात्रोत्सवाची सांगता झाली.
कणकवलीतील श्री स्वयंभूचा यात्रोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 5:23 PM
kankvali, sindhudurgenews, Religious Places कणकवलीचे ग्रामदैवत श्री स्वयंभू व श्री रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून झालेल्या या जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री स्वयंभू मंदिरात सकाळ पासूनच भाविकानी दर्शन घेतले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती.
ठळक मुद्देकणकवलीतील श्री स्वयंभूचा यात्रोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !