मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा सेवांगण मार्ग येथील पावलू जॉन रॉड्रिक्स कुटुंबीय आपल्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक वीजवाहिन्या हटविण्यासाठी वीज वितरणशी १० वर्षे लढा देत आहेत. मात्र, वीजवाहिन्या हटविणे अथवा त्यांचा मार्ग बदलणे याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रॉड्रिक्स कुटुंबीय हतबल झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी या धोकादायक मार्गावरील एक वीजवाहिनी तुटून पडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नव्हती. पावलू रॉड्रिक्स हे गेली १० वर्षांहून अधिक काळ सातत्याने वीज वितरणकडे वीजवाहिन्या हटविण्याबाबत पाठपुरावा करीत आहेत. डेविड, ग्रेसीस हे अन्य दोन भाऊ व कुटुंबीय यांसोबत आम्ही राहत असलेल्या घर परिसरातून या वीजवाहिन्या जातात. मासेमारी साहित्य व अन्य किमती लाकडी साहित्य असलेल्या झोपडी जवळून वीजवाहिन्या जातात. येथे स्पार्किंग होऊन झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा तसेच अन्य अपघात होण्याचा धोका आहे. आमच्या माड बागायतीतील काही झाडांची झावळे वीजवाहिन्यांना स्पर्श करतात म्हणून वीज कर्मचारी सातत्याने तोडतात. त्यामुळेही आमचे नुकसान होत आहे. लगतच्या वीज ग्राहकांना अन्य वीज मार्गांची उभारणी झाली आहे. अशा स्थितीत आमच्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक स्थितीतील विनापरवाना वीजवाहिन्या हटवाव्यात अशी मागणी पावलू रॉड्रिक्स यांनी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग : वीजवाहिन्या हटविण्यासाठी रॉड्रिक्स कुटुंबीयांचा १० वर्षे लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:21 PM
मालवण शहरातील धुरीवाडा सेवांगण मार्ग येथील पावलू जॉन रॉड्रिक्स कुटुंबीय आपल्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक वीजवाहिन्या हटविण्यासाठी वीज वितरणशी १० वर्षे लढा देत आहेत. मात्र, वीजवाहिन्या हटविणे अथवा त्यांचा मार्ग बदलणे याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रॉड्रिक्स कुटुंबीय हतबल झाले आहेत.
ठळक मुद्देवीजवाहिन्या हटविण्यासाठी रॉड्रिक्स कुटुंबीयांचा १० वर्षे लढान्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा