सिंधुदुर्गनगरी : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५,३१५ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २१ मतदार केंद्रामधून २५ रोजी मतदान तर २८ जून रोजी मुंबईत मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण खाडे यांनी दिली.१ जानेवारी २०१८ च्या अहर्ता दिनांकावर कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी ४,५८७ मतदार जिल्ह्यात होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्यावतीने जिल्ह्यात निरंतर मतदान नोंदणी पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार ७२८ मतदारांनी नावनोंदणी केली होती. त्यामुळे आता पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५३१५ मतदार निश्चित करण्यात आले आहेत.कोकण पदवीधर मतदार संघासाठी २८ रोजी मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी कुठे होणार हे निश्चित झालेले नाही. मात्र ही मतमोजणी मुंबई येथे होणार असल्याची माहिती प्रविण खाडे यांनी दिली.मतदारांना स्मार्ट कार्डच्या धर्तीवर मतदान ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम सुरू आहे. मतदारांनी आपला फोटो व आवश्यक ती माहिती संबंधित बुथ लेवल आॅफीसर यांच्याकडे देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रविण खाडे यांनी केले आहे.२१ मतदार केंद्र निश्चितकोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यात वैभववाडी, देवगड, शिरगाव, पडेल, कासार्डे, कणकवली, फोंडा, आचरा, मालवण, मसुरे, कट्टा, कडावल, कुडाळ, ओरोस, माणगाव, वेंगुर्ला, शिरोडा, मळेवाड, सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग यांचा समावेश आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमपदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे १ ते ७ जून, अर्जाची छाननी व पात्र अर्ज प्रसिद्ध करणे ८ जून, उमेदवारी अर्ज मागे घेणे ९ ते ११ जून, मतदान २५ जून (सकाळी ८ ते ४ वाजेपर्र्यत), मतमोजणी २८ जून रोजी असा निवडणूक कार्यक्रम आहे.
सिंधुदुर्ग : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात ५,३१५ मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:18 PM
कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५,३१५ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २१ मतदार केंद्रामधून २५ रोजी मतदान तर २८ जून रोजी मुंबईत मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण खाडे यांनी दिली.
ठळक मुद्देकोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात ५,३१५ मतदार