मालवण : तालुक्यातील वाळू उत्खननावर केलेल्या धडक कारवाईनंतर तहसीलदार समीर घारे यांनी अनधिकृत चिरे उत्खननावर कारवाई केली आहे. असरोंडीतील चार आणि आंबेरीतील एका चिरेखाणींवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. चिरेखाण व्यवसाय करण्यासाठी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे चिरेखाण व्यवसाय केल्याप्रकरणी पाचही जणांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.मालवण तालुक्यातील असरोंडी आणि आंबेरी याठिकाणी अनधिकृतपणे गौण खनिज अर्धा जांभा दगडाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदारांनी कारवाई करत लाखो रूपयांची मशिनरी सील केली आहे. असरोंडीतराजेश सावंत, संदीप सावंत, नयन राणे, विनायक मेस्त्री या चार जणांवर तर आंबेरीत सागर गोवेकर याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत असरोंडी येथील राजेश मधुकर सावंत यांचे दोन टिलर १ जेसीबी, १ आयव्ही मशिन, चार डंपर, संदीप रामचंद्र सावंत यांची एक मशिन, कटर, नयन भास्कर राणे यांची एक मशिन, दोन टिलर, एक इंपर, विनायक भालचंद्र मेस्त्री यांची मशिन, टिलर, कटर तर आंबेरी येथील सागर चंद्रकांत गोवेकर यांची जेसीबी, जनरेटर, १२० ब्रास जांभा दगडावर कारवाई करत लाखो किमतीचे साहित्य सील केले.
सिंधुदुर्ग : महसूलची पाच चिरेखाणींवर कारवाई, खाण मालकांवर दंडात्मक कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 4:49 PM
मालवण तालुक्यातील वाळू उत्खननावर केलेल्या धडक कारवाईनंतर तहसीलदार समीर घारे यांनी अनधिकृत चिरे उत्खननावर कारवाई केली आहे.
ठळक मुद्देमहसूलची पाच चिरेखाणींवर कारवाईखाण मालकांवर दंडात्मक कारवाई होणार