सिंधुदुर्गनगरी : जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये ३७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या ८०० कामांचा १४ कोटी ४२ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यातील कामांना आता मंजुरी देण्यात येत आहे.
९ कोटी ९६ लाख रुपये खर्चाच्या ६११ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील २४५ कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. तर अद्याप १८९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत.पिण्याच्या पाण्यापासून टंचाईमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षाकरिता जिल्ह्यातील ३७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांची शिवार फेरी काढून ८०० कामांचा आराखडा तयार करण्यात आला.
यासाठी १४ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. मंजूर आराखड्यातील कामांची अंदाजपत्रके तयार करून प्रत्यक्ष कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. १० कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या ६२५ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ९९ लाख रुपये खर्चाच्या २५५ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
या ३७ गावांमध्ये देवगड तालुक्यातील नाडण, धालवली, सौंदाळे, वैभववाडी तालुक्यातील नावळे, पालांडेवाडी, कणकवली तालुक्यातील कळसुली, हरकुळ बुद्रुक, नाटळ, भिरवंडे, ओसरगाव, हळवल, मालवण तालुक्यातील किर्लोस, असगणी, कुंभारमाठ, तिरवडे, साळेल, कुडाळ तालुक्यातील आंजिवडे, पोखरण, कुसबे, पिंगुळी, कुसगांव, नेरूर तर्फ हवेली, अणाव, वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, भंडारवाडा, गवाण, सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, सावरवाड, बांदा, चौकुळ, कोनशी, दाभोळे तर दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, आयनोडे, घाटीवडे, खायनाळे, झोळंबे या गावांचा सामावेश आहे. याच गावातील ६११ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
२0१६-१७ ची १९७ कामे शिल्लक४२०१६-१७ या वर्षामध्ये जिल्ह्यातील २३ गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करण्यात आला होता. या गावांचा ३३३ कामांचा १५ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता.४आतापर्यंत यातील २०६ कामे पूर्ण झाली आहेत. १२७ कामे शिल्लक राहिली आहेत. पूर्ण झालेल्या कामांना ६ कोटी ३० लाख २३ हजार रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. शिल्लक १२७ कामातील ३२ कामे प्रगतीपथावर आहेत.
४ अजून ८ कोटी ८१ लाख ७१ हजार रुपये एवढा निधी खर्च करावयाचा आहे. २०१७-१८ या वर्षातील कामाबरोबर गेल्या वर्षातील १२७ कामे पूर्ण करण्याचे आव्हान अंमलबजावणी यंत्रणेसमोर राहणार आहे. तसेच यावर्षीच्या निधी खर्चाबरोबर गेल्यावर्षीचा ८ कोटी ८१ लाख ७१ हजार रुपये खर्च या विभागाला करावा लागणार आहे.सिद्धीविनायक ट्रस्टकडून १ कोटीचा निधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत कामे करण्यासाठी मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे हा निधी ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी धनादेशाद्वारे दिला.