देवगड : मिठमुंबरीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पर्यटनाच्या विषयावर चर्चा केली पाहिजे. गावविकासासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.श्री मुंब्रादेवी मंदिर देवस्थान ट्रस्ट व श्री मुंब्रादेवी विकास मंडळ मुंबई देवालयाच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त उत्सव विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संदिप साटम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश राणे, बाळ खडपे, देवगड नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, उपनगराध्यक्ष संजय तारकर, मिठमुंबरी सरपंच रिमा मुंबरकर, उपसरपंच उल्हास गावकर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, गणपत गांवकर, सूर्यकांत खवळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत तोडणकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेश गावकर, अजय तोडणकर, गणेश गावकर, पंचायत समिती सदस्य निकिता कदम, शंकर गावकर, दक्षता मुंबरकर, रसिका गावकर, महिला तालुकाध्यक्ष उष:कला केळुस्कर, नरेश डामरी, संजय गावकर, प्रकाश वाळके उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना राणे म्हणाले की, मिठमुंबरी गावाला उत्तम असे निसर्ग सौदर्य लाभले असून याचा फायदा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून येथील ग्रामस्थांनी घेतला पाहिजे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्सव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत हेमंत तोडणकर, राजेश गावकर यांनी केले तर सूत्रसंचालन तुळशीदास डामरी व आभार गणेश गावकर यांनी मानले.पर्यटनातूनच गावाचा विकास होणार !मिठमुंबरी पुलाच्या माध्यमातून आता येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनातूनच येथील गावाचा विकास होणार असून यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. गावाच्या विकासासाठी आपण ग्रामस्थांच्या पाठिशी कायमच राहणार असल्याचा विश्वासही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला.