मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पावसाळ्यानंतर ही कामे मार्गी लागतील, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.मालवण तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत या मार्गावरून वाहने चालवावी लागत आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.याची दखल घेत वैभव नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांच्या कामाची मंजुरी मिळविली आहे.यामध्ये चव्हाटा-आंबेरी रस्ता, महान-हुमरस रस्ता, चौके नवाघर देवली रस्ता, बिळवस भोगलेवाडी रस्ता, कुंभारमाठ पॉलिटेक्निक रस्ता या कामांचा समावेश आहे. कामाच्या तांत्रिक मान्यतेनुसार चव्हाटा-आंबेरी रस्त्यासाठी २ कोटी ६६ लाख, महान-हुमरस रस्त्यासाठी १ कोटी ८७ लाख, चौके नवाघर देवली रस्त्यासाठी १ कोटी ६० लाख, बिळवस भोगलेवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४५ लाख, कुंभारमाठ पॉलिटेक्निक रस्त्यासाठी १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोकण प्रादेशिक विभाग ठाणेचे अधीक्षक अभियंता आर. एम. गोसावी यांच्याकडून या कामाला मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले आहे.चढावांची उंची कमी होणारमालवण तालुक्यात ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण, रुंदीकरण, चढावांची उंची कमी करणे आदी कामे केली जाणार आहेत. या रस्त्यांच्या मजबुतीकरण व नूतनीकरणामुळे वाहनचालक व प्रवाशांना होणारा त्रास दूर होणार आहे.
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवणातील पाच रस्ताकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 4:48 PM
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पावसाळ्यानंतर ही कामे मार्गी लागतील, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवणातील पाच रस्ताकामांना मंजुरीवैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश