शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे : बबन साळगावकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 3:01 PM

दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले या भागांसाठी सावंतवाडी या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करण्यात यावे. त्यासाठी मंजूर झालेले शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे वीस कोटी रुपये खर्च करण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देसावंतवाडीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे : बबन साळगावकर दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी ठराव घेत शासनाकडे पाठवावे

सिंधुदुर्ग : दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले या भागांसाठी सावंतवाडी या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करण्यात यावे. त्यासाठी मंजूर झालेले शासकीय मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे वीस कोटी रुपये खर्च करण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

तीनही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी तशाप्रकारचा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या पालिकेच्या मासिक बैठकीत याबाबतचा ठराव साळगावकर यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.साळगावकर म्हणाले, गोवा-बांबोळीत उपचार बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोवा-बांबोळीत उपचार पुन्हा नि:शुल्क सुरू करण्यात यावेत, ही मागणी योग्य आहे. पण आम्ही आता किती दिवस अन्य राज्यांवर अवलंबून रहावे हा सुध्दा मुद्दा महत्त्वाचा आहे.

शासनाकडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जाहीर करण्यात आलेला वीस कोटी रुपयांचा निधी लक्षात घेता आणखी दहा कोटी रुपये वाढवून देण्यात यावेत आणि सावंतवाडीत नव्याने पाचशे बेड क्षमता आणि शंभर विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे. तात्पुरत्या स्वरुपात येथील कुटीर रुग्णालयाला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा. त्याचा फायदा सावंतवाडीसह वेंगुर्ले आणि दोडामार्ग भागातील लोकांना होणार आहे.साळगावकर पुढे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कणकवली, कुडाळ, मालवण या भागांसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

या तीन तालुक्यातील रुग्णांना एकाच छताखाली हृदयविकारासारखे सर्व तज्ज्ञ डॉक्टर, ट्रामाकेअर सेंटर आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत. याठिकाणी मेडिकल कॉलेज उभारण्यात यावे यासाठी आवश्यक असलेले ठराव तीनही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी व पंचायत समिती स्तरावर घेण्यात यावेत, असे आवाहन साळगावकर यांनी केले. 

मी बाळासाहेबांचा कार्यकर्तालोकांवरील अन्यायाविरोधात झटणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. त्यामुळे कोठे अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरण्यास मी कसलाही राजकीय फायदा बघत नाही किंवा कमीपणा घेत नाही. मी आजवर पदासाठी राजकारणात आलो नाही. पदे मला नशिबाने मिळत गेली. कोणाच्या टीकेचा मी विचार करीत नाही.- बबन साळगावकर,नगराध्यक्ष, सावंतवाडी 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग