प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): करुळ दिंडवणेवाडीनजिक घाटमार्गांपासून 100 मीटर अंतरावर झुडपात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.महिला पंचेचाळीशीची असून अंगावर दुधी रंगाची साडी व तांबड्या रंगाचा ब्लाऊज तर हातात लाल रंगाच्या बांगड्या आहेत. मृतदेहाशेजारी काळ्या रंगाचे चप्पल आढळले आहे. मृत महिलेच्या चेह-यावर वार केल्यासारख्या खुणा आढळून येत आहेत. मृतदेहाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, उपनिरीक्षक जयश्री भोमकर, हवालदार दशरथ घाडीगावकर, पोलीस नाईक, बी. बी चौगले, पी. एन. गरदरे, पोलीस शिपाई, गणेश भोवड, एस टी शिंदे, एस.आर, इंजुलकर, पोलीस पाटील प्रताप पाटील, घटनास्थळी पोहोचले होते.
गळ्यातील मंगळसुत्राच्या पद्धतीवरुन मृत महिला घाटमाथ्यावरील असण्याची शक्यता आहे. मृतदेह चार दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस बाकारे स्वतः तसेच काही पोलीस कर्मचारी झुडपात काही धागेदोरे हाती लागतात का? याचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळावरील परिस्थितीवरुन प्रथमदर्शनी घातपाताची शक्यता निर्माण झाली आहे.