कणकवली : केंद्र सरकार २० एप्रिल रोजी देशभरात उज्ज्वला दिवस पाळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कार्यक्रम घेण्यात येणार असून महिलांचे मेळावे व गॅस कनेक्शन वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अतुल काळसेकर पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करण्यात आली असून या योजना घेऊन भाजपचे पदाधिकारी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. कुणाला कुठल्या योजनेचा लाभ मिळू शकतो याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.देशभरातील साडेपाच कोटी कुटुंबापर्यंत उज्ज्वला गॅस जोडण्या मिळाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ महिला मेळावे घेण्यात येणार आहेत. कणकवलीत २, फोंडा-१, देवगड-१, विजयदुर्ग-१, कुडाळमध्ये २, मालवणमध्ये २, ओरोस येथे १, वेंगुर्लेत १, सावंतवाडीत १, बांदा १, दोडामार्ग १ असे मिळून १४ कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.मागासवर्गीय समाजातील लोकांनाही या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. सोनवडे व आंजिवडे घाट रस्त्याच्या सर्व्हेक्षण कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू झाल्या असल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी दिली.योजनांचा लाभ मिळवून देणारजिल्हावासीयांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच नरेंद्र मोदी ड्रीम प्रोजेक्ट राबविण्यात येणार असून प्रत्येक घरात गॅस कनेक्शन पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग : देशभरात उद्या उज्ज्वला दिवस, अतुल काळसेकर यांची माहिती : जिल्ह्यात १४ कार्यक्रम घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 6:35 PM
केंद्र सरकार २० एप्रिल रोजी देशभरात उज्ज्वला दिवस पाळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कार्यक्रम घेण्यात येणार असून महिलांचे मेळावे व गॅस कनेक्शन वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देदेशभरात उद्या उज्ज्वला दिवसअतुल काळसेकर यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ कार्यक्रम घेणार