सिंधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू आणि आंबा उत्पादकांना आता आपला माल थेट वाशी मार्केटमध्ये आणून विकता येणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून एपीएमसी मार्केटमध्ये एक हजार चौरस फुटाचा गाळा उपलब्ध होणार आहे.
दिलेले वचन तातडीने पूर्ण केल्याबद्दल काजू प्रक्रियाधारक संघ आणि रत्नागिरी शेतकरी संघटनेने याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे खास आभार मानले आहेत.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे अर्थकारण काजू आणि आंबा पिकावर असते. काजूला स्थानिक बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणि पर्यायाने काजू उत्पादकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी काजू प्रक्रियाधारक संघ आणि रत्नागिरी जिल्हा शेतकरी संघटनेने त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या. यावेळी नारायण राणे यांनी काजू प्रक्रियाधारक संघाला दिलासा दिला होता.
या समस्येतून काय मार्ग काढता येईल, असे विचारले असता काजू आणि आंबे थेट नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकता आले तर प्रत्येक किलोमागे ३० ते ४० रुपयांचा फरक पडू शकतो, असे उत्पादकांच्यावतीने सांगितले होते. तेव्हा राणे यांनी निलेश राणे यांना या प्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या.निलेश राणे यांनी याठिकाणी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये गाळा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्यावर सोनी यांनी एपीएमसी मार्केटमध्ये एक हजार चौरस फुटाचा गाळा देण्याचे मान्य केले. ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.निलेश राणे यांनी केलेल्या या प्रयत्नांबद्दल काजू प्रक्रियाधारक संघ आणि शेतकरी संघटना रत्नागिरी जिल्ह्यातर्फे नारायण राणे आणि निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला माल थेट नवी मुंबईत आणून विकता येणार आहे.थेट माल विकण्यासाठी स्वतंत्र गाळा पाहिजेनवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील शेतकºयांना आपला माल थेट विकता यावा यासाठी एक स्वतंत्र गाळा मिळाला पाहिजे, अशी मागणी करण्यासाठी बुधवारी माजी खासदार निलेश राणे एमपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले.
तिथे नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे आणि अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक सतीश सोनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत काजू प्रक्रियाधारक संघाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पवार, सचिव मुकेश साळुंखे, खजिनदार मुकेश देसाई उपस्थित होते.