शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 3:39 PM

रस्ता तिथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवले आहे. सत्तर वर्षांची दीर्घकाळ सेवा देणे खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. आपल्या निरंतर सेवेतून एसटीने प्रवाशांचा विश्वास प्राप्त केला आहे. म्हणूनच एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांनी केले.

ठळक मुद्देमालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरानिरंतर सेवेतून एसटीने विश्वास प्राप्त केला : डॉ. सुभाष दिघे

मालवण :रस्ता तिथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवले आहे. सत्तर वर्षांची दीर्घकाळ सेवा देणे खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. आपल्या निरंतर सेवेतून एसटीने प्रवाशांचा विश्वास प्राप्त केला आहे. म्हणूनच एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांनी केले.मालवण एसटी बस स्थानकात एसटीचा ७० वा वर्धापनदिन ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष दिघे हे बोलत होते. यावेळी एसटीचे उपयंत्र अभियंता ए. एस. मांगलेकर, आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर, ए. एस. निव्हेकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर, अ. ना. ओटवणेकर, विनायक चव्हाण, प्रसाद करंदीकर, सुभाष पाटकर, काका खोत, बाळा मालंडकर, जयसिंग कुबल, डी. एम. हिंदळेकर, प्रविण शिंदे, शेखर वाईरकर, प्रसाद बांदेकर, अमित शंकरदास आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मालवण- मुंबई शिवशाही बस फेरीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून त्याबाबत लवकरच कार्यवाही होईल. प्रवाशांच्या सूचना लक्षात घेऊन यापुढेही आवश्यक त्या सुधारणा व बदल करण्यात येतील असेही मांगलेकर म्हणाले.यावेळी बाळकृष्ण माणगावकर, नंदकिशोर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. बसस्थानक परिसरात रांगोळी रेखाटणाऱ्या सुभाष पाटकर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसाद करंदीकर यांनी केले.प्रवाशांना चांगली सेवाप्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन नेहमीच तत्पर असते. प्रवाशांसाठी विविध सवलतीच्या योजनाही एसटी राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून नव्याने सुरू झालेल्या शिवशाही गाडीत ज्येष्ठ नागरिकांना गाडीच्या दोन प्रकारांमध्ये ४५ टक्के व ३० टक्के अशी सवलत देण्यात येणार आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. असेही एसटीचे उपयंत्र अभियंता मांगलेकर म्हणाले,

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग