कणकवली : सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यात बेलदार भटका समाज वसलेला आहे. या समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने त्यांना तसेच समाजातील इतर घटकांना संघटित करण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेची तालुका कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक, नूतन व माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेची सभा जानवली शिक्षक कॉलनी येथील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण होते. यावेळी संघटना समन्वयक बाळासाहेब चव्हाण, मधुकर जाधव, मारुती जाधव, दिनकर जाधव, सुभाष जाधव, विश्वास जाधव, रंगराव जाधव, धर्मा जाधव, लवू चव्हाण आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मारुती जाधव, रवी जाधव तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना नूतन महिला-पुरुष तालुका कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष रवी जाधव (कणकवली), उपाध्यक्ष सुरेश चव्हाण (खारेपाटण), खजिनदार चंद्रकांत चव्हाण (तळेरे) तर महिला तालुकाध्यक्षा सुषमा जाधव (कणकवली), उपाध्यक्षा पूजा चव्हाण (वारगाव), सचिव वर्षा जाधव, खजिनदार विद्या जाधव (कणकवली) तर सदस्य म्हणून निलेश जाधव (कणकवली), विजय जाधव (खारेपाटण), सुरेश शंकर चव्हाण (खारेपाटण), राम चव्हाण (तळेरे), कैलास पवार (तळेरे), रणजित चव्हाण (तळेरे), उर्मिला चव्हाण (वारगाव), आकांक्षा जाधव (कणकवली), अश्विनी जाधव (कणकवली), वंदना चव्हाण आदी पदाधिकाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या सभेचे सूत्रसंचालन रुपेश जाधव यांनी केले.शासकीय मदत मिळवून देणारसंघटनेच्यावतीने समाजातील महिलांसाठी रोजगार निर्माण करण्याचे ठरविण्यात आले. तसेच महिलांचे बचतगट गठीत करून शासनाच्या योजना राबवून आर्थिक सबल होण्यासाठी संघटनेच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. समाजातील अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या भगिनींना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
सिंधुदुर्ग : बेलदार समाज संघटित करण्याचा निर्धार, सभेत तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:56 PM
सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यात बेलदार भटका समाज वसलेला आहे. या समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने त्यांना तसेच समाजातील इतर घटकांना संघटित करण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेची तालुका कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली.
ठळक मुद्देबेलदार समाज संघटित करण्याचा निर्धार, सभेत तालुका कार्यकारिणी जाहीरपदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; महिलांना संघटित करण्यासाठी प्रयत्न करणार