सिंधुुदुर्ग : आंबा कॅनिंग खरेदी घेताना कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आंबा कॅनिंगला प्रति किलो ४२ ते ४५ रुपये मिळणे आवश्यक असून, याप्रश्नी शासनस्तरावरून शेतकरी व कारखानदार यांची बैठक घेण्याचा निर्णय वेंगुर्ले तालुका आंबा काजू बागायतदार व शास्त्रज्ञ यांच्या बैठकीत घेण्यात आला.वेंगुर्ले तालुका आंबा काजू बागायतदार व शास्त्रज्ञ मंचची सभा मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्र वेंगुर्ले येथे झाली.
यावेळी फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, कायदेशीर सल्लागार अॅड. प्रकाश बोवलेकर, हनुमंत आंगचेकर, विलास ठाकूर, सदाशिव आळवे, कमलाकांत शेणई, दाजी धुरी, भारत होडावडेकर, प्रकाश गडेकर, गुंडू नाईक, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्र्रशेखर सातार्डेकर, बाबी चिपकर आदी आंबा-काजू बागायतदार उपस्थित होते.शेतकरी, कारखानदार बैठकीसाठी प्रयत्नसंजय सामंत यांनी बँक आॅफ इंडिया वेंगुर्ले शाखेच्या अधिकाऱ्यांनी १४५ शेतकऱ्यांची विमा रक्कम भरलेली असूनही ती पाठविली नसल्याने सुमारे सहा लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. या प्रकाराला बँक जबाबदार असल्याने ती रक्कम तत्काळ संबंधित शेतकऱ्यांना देण्यासंबंधी झालेल्या कारवाईची माहिती दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, नुकसान भरपाई देण्याची तरतूद असताना शासनाच्या नाकर्तेपणामुळे ती रक्कम अद्यापही मिळू शकली नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आंबा कॅनिंगला प्रति किलो ४२ ते ४५ रुपये असणे आवश्यक असून याप्रश्नी शासनस्तरावरून शेतकरी व कारखानदार यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. आंबा व काजूच्या सद्यस्थितीविषयी उपस्थित शास्त्रज्ञांनी माहिती दिली.