शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सिंधुदुर्ग :  इमारत स्थलांतर विषय पुन्हा वादग्रस्त, देवगड पंचायत समिती बैठकीत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 2:25 PM

देवगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय पंचायत समितीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा विषय पुन्हा वादग्रस्त ठरला असून कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचा आक्रमक इशारा पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी बैठकीत विभागाला दिला.

ठळक मुद्दे इमारत स्थलांतर विषय पुन्हा वादग्रस्त, देवगड पंचायत समिती बैठकीत इशारा  कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणारसदस्यांचा पाणीपुरवठा विभागाला इशारा

देवगड : देवगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय पंचायत समितीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा विषय पुन्हा वादग्रस्त ठरला असून हे कार्यालय देवगड पंचायत समिती इमारतीमध्ये स्थलांतरित न केल्यास लोकप्रतिनिधी म्हणून योग्य ती कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचा आक्रमक इशारा देवगड पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी पंचायत समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाला दिला.देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या अनुपस्थितीत उपसभापती संजय देवरूखकर यांच्या अध्यक्षतेखाली किसान भवन सभागृहात पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर उपस्थित होत्या.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय स्थलांतरणाचा विषय या बैठकीत देखील गाजला. देवगड पंचायत समिती इमारतीमध्ये कार्यालयाला नियमानुसार क्षेत्रफळ असलेली जागा नसल्यामुळे पाणीपुरवठा विभागाने कार्यालय स्थलांतरित करण्यास नकार दिला.

यामुळे संतप्त झालेल्या सदस्य अजित कांबळे यांनी जागेची कारणे सांगू नका असे खडे बोल सुनावत यासाठी पर्याय आहेत. मात्र, कार्यालय स्थलांतरित करण्याची मानसिकता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाही असे सांगून आपण हे कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करू व पुढील पाऊले उचलू असा इशारा पाणीपुरवठा विभागाला दिला.कामचुकार शिक्षकांवर कारवाई करा, अशी मागणी सदस्य लक्ष्मण पाळेकर यांनी केली. ग्रामपंचायतीच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी गटविकास अधिकारी व संबंधित विस्तार अधिकाऱ्यांनी सरप्राईज भेट द्यावी अशी सूचना पाळेकर यांनी मांडली. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून टंचाईच्या कामांना तीन दिवसात मंजुरी द्यावी अशी मागणी सदाशिव ओगले यांनी केली.एमआरजीएसमधून वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीचे प्रस्ताव ग्रामसभेने मंजूर करूनही अंतराचा दाखला व वरिष्ठ भूवैज्ञानिक दाखला देण्यासाठी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. सन २०१७-१८ मधील प्रस्ताव अंतराचे दाखले देण्यास टाळाटाळ करून लघुपाटबंधारे विभागाने रखडवले आहे असा आरोप करीत सदाशिव ओगले यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली.एसटी फेरीच्या समस्येबाबत लक्ष वेधलेऐन हंगामात एसटीच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या. याकडे पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाळेकर यांनी लक्ष वेधले. यावेळी देवगड आगारव्यवस्थापक डी. एम. चव्हाण यांनी आगारामध्ये १३ गाड्या कमी असल्यामुळे फेऱ्यांचा नियोजनावर परिणाम होत असल्याचे सांगितले

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग