सिंधुदुर्ग : दहशतवादी सनातनवर बंदी घाला, जिल्हा काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:09 PM2018-08-23T12:09:03+5:302018-08-23T12:13:47+5:30
सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका?्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ओरोस : सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद जैतापकर, ईर्षान शेख, संतोष जोईल आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. परुळेकर म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुरुवातीला २० बॉम्ब आणि स्फोटके जप्त केली होती. त्यानंतर आणखी ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी सनातनसंस्थेच्या वैभव राऊतसह इतर दोन-तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. ही खूप मोठी घटना असून याद्वारे देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धमार्चे ध्रुवीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी तसेच त्याचे मुखपत्र सनातन प्रभात हेही बंद करण्यात यावे अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे त्याबाबतचे निवेदनहि आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती डॉ जयेंद्र परुळेकर यांनी दिली.
त्या सदस्यांवर कारवाई करणार
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकित राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षाच्या "हात" या चिन्हावर ५० पैकी २७ सदस्य निवडून आले आहेत. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन होताच या सर्व सदस्यांनी स्वतन्त्र गट स्थापन केला आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला सदस्य स्वतंत्र गट स्थापन करू शकत नाही आणि तसे केल्यास ती व्यक्ति अपात्र ही होवू शकते असे सांगत जिप मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या २७ सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.