आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १७ : समर्थ युवा या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ते २१ मे दरम्यान तालुकानिहाय व विषयनिहाय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक १९ मे रोजी ११.३0 ते १ या वेळेत वैभववाडी तहसिलदार कार्यालय येथे लेखाधिकारी पांडूरंग थोरात यांचे इतिहास विषयावर तर ४ ते ६ या वेळेत देवगड नगरपालिका येथे नायब तहसिलदार जाधव यांचे इतिहास विषयावर आणि दोडामार्ग तहसिलदार कार्यालय येथे ४ ते ६ या वेळेत दोडामार्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांचे अर्थशास्त्र विषयावर होणार आहे.दिनांक २0 मे रोजी ९ ते १0 या वेळेत कणकवली येथील तहसिलदार कार्यालयात उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांचे इतिहास विषयावर तर ४ ते ६ या वेळेत ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जुना डी. पी. डी. सी. हॉल येथे लेखाधिकारी पांडूरंग थोरात इतिहास विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दिनांक २१ मे रोजी वेंगुर्ला येथील तहसिलदार कार्यालय येथे ११ ते १ या वेळेत तहसिलदार पवार यांचे बुध्दिमता विषयावर तर मालवण तहसिलदार कार्यालय येथे नायब तहसिलदार धनश्री भालचीम यांचे ११ ते १ या वेळेत इतिहास विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच सावंतवाडी येथील तहसिलदार कार्यालयात लेखाधिकारी पांडूरंग थोरात यांचे ११ ते १ या वेळेत इतिहास विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात समर्थ युवा उपक्रमांतर्गत २१ मेपर्र्यत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग
By admin | Published: May 17, 2017 2:00 PM