आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0७: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.६७ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १0९९.६१ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. दोडामार्ग-१४, सावंतवाडी ८.३, वेंगुर्ला- ३.0८, कुडाळ -९, मालवण -१, कणकवली -६, देवगड- २, वैभववाडी १0.
तिलारी पाणलोट क्षेत्रात ५३ मि.मि. पाऊस
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ५३.२0 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १४५५ मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात २७३.0५४0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ६.५ मि.मी. एकूण पाऊस १0४५.२0 मि.मि. कोर्ले, सातंडी १५ मि.मि. एकूण पाऊस ८६१ मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ५४.३५९0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.