सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २९.७५ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात २४२७.७ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस
दोडामार्ग-२0, सावंतवाडी -५१ , वेंगुर्ला- २५, कुडाळ -२७ , मालवण -९, कणकवली -४९, देवगड- ९, वैभववाडी -४८.
तिल्लारी आंतराज्य पाणलोट क्षेत्रात ५५.२0 मि.मि. पाऊस
तिल्लारी आंतराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ५५.२0 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत ३२२१.२0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात ४१९.३0६0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.
देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ४९.५0 मि.मी. एकूण पाऊस २८११.७0 मि.मि. कार्ले-सातंडी ४५ मि.मि. एकूण पाऊस २४५0 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ८४.७0७0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.