सिंधुदुर्ग : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरसारी 13.27 मि.मी पाऊस झाला असून 1 जून 2019 रोजी पासून आजपर्यंत एकूण 1618.28 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 03 (1806), सावंतवाडी 16 (1367), वेंगुर्ला 3.2 (1840.24), कुडाळ 17 (1610), मालवण 01 (1314), कणकवली 18 (1862), देवगड 08 (1264), वैभववाडी 40 (1883) पाऊस झाला आहे.आडेली प्रकल्पातून 21.16 घ.मी. प्रतिसेकंद विसर्ग सुरूवेंगुर्ला तालुक्यातील आडेली लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरला असून या प्रकल्पातून 21.16 घ.मी प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पामध्ये सध्या 1.2880 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प 61.02 टक्के भरला असून या धरणातून सध्या 24.30 घ.मी. प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाफोली, सनमटेंब, तिथवली हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत.तिलारी आंतरराज्य प्रकल्प 76.65 टक्के भरला असून सध्या या धरणामध्ये 342.9190 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्राल गेल्या चोवीस तासात 2.40 मि.मी पाऊस झाला असून 1902 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून सध्या हे धरण 43.53 टक्के भरले आहे.