शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

सिंधुदुर्ग : कुडाळातील आरोग्य कर्मचाऱ्याची आत्महत्या,आत्महत्येचे कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 5:36 PM

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व कुडाळ बाजारपेठ येथील रहिवासी यशवंत उर्फ सचिन गोविंद शिरसाट (३५) यांनी रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची कुडाळ पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुडाळातील आरोग्य कर्मचाऱ्याची आत्महत्याआत्महत्येचे कारण अस्पष्ट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व कुडाळ बाजारपेठ येथील रहिवासी यशवंत उर्फ सचिन गोविंद शिरसाट (३५) यांनी रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची कुडाळ पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.शिरसाट यांचे कुडाळ बाजारपेठेतील समादेवी मांड येथे घर असून, ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात चालक या पदावर कार्यरत होते. गेल्या काही कालावधीपासून ते जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते.रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर ते घराच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेले होते.

सकाळी उशिरापर्यंत ते उठले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना उठविण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला आतून कडी होती. खोलीचा दरवाजा ठोठावूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला असता शिरसाट यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावल्याचे दिसून आले.कुडाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यशवंत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, बहीण, भावोजी असा परिवार आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग