वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मच्छिमार्केटलगतच्या धोकादायक इमारतीतील असणाऱ्या त्या पंधरा गाळ््यांचा ताबा अखेर नायब तहसीलदारांच्या पथकाने नगरपरिषदेकडे दिल्यानंतर नगरपरिषदेने हे सर्व गाळे जमीनदोस्त केले.नगरपरिषद मच्छिमार्केटलगतच्या इमारतीतील १५ व्यापारी गाळेधारकांना ही इमारत धोकादायक झाल्याने गाळे खाली करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, गाळेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने सर्व गाळेधारकांना व्यवसायासाठी ३१ जुलै रोजी सोडत पद्धतीने पर्यायी गाळे संबंधित गाळेधारकांना द्यावेत व १४ आॅगस्ट सायंकाळपर्यंत जुन्या गाळ््यांचा ताबा घेण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले होते. त्यानुसार सोडत पद्धतीने दहा गाळेधारकांनी गाळे घेतले. मात्र, अकरापैकी एकाही गाळेधारकाने नगरपरिषदेकडे जुन्या गाळ््यांचा ताबा १५ आॅगस्टपर्यंत दिला नव्हता.त्यानुसार गुरुवारी वेंगुर्लेचे निवडणूक नायब तहसीलदार संतोष बांदेकर, निवासी तहसीलदार नागेश शिंदे, मंडळ निरीक्षक बी. सी. चव्हाण, तलाठी व्ही. एन. सरवदे, नागराज, लिपीक ए. आर. पोळ यांच्या पथकाने दुपारी ३ वाजता गाळ््यांची पाहणी केली.
हे गाळे रिक्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचा पंचनामा करुन गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात दिले. या प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे. त्यानंतर नगरपरिषदेकडून सर्व गाळे जमीनदोस्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.पंचनामे करून नगरपरिषदेच्या ताब्यातयाबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गाळ््यांचा ताबा नगरपरिषदेला मिळवून देण्याची मागणी केली. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांनी वेंगुर्ले नायब तहसीलदारांना पंचनामे करुन हे गाळे नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महसूल विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करून हे गाळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले होते.