शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिंधुदुर्ग : कणकवलीत कचरा निर्मूलन प्रकल्प, जिल्ह्यातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 4:07 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीत कचरा निर्मूलन प्रकल्प, जिल्ह्यातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार जिल्हा प्रशासनाकडे सादरीकरण, नीतेश राणेंची माहिती

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे.

ए. जी. डॉटर्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्यातून जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला असून याबाबतचे सादरीकरण आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यामुळे जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कचऱ्यांची फार मोठी समस्या असून कचऱ्यांचा प्रश्न म्हणजे स्थानिक नगरपालिका, नगरपंचायतींची डोकेदुखी बनला आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अभिनव संकल्पना सिंधुदुर्गात आणली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ए. जी. डॉटर्स या कंपनीच्या सहाय्याने सिंधुदुर्ग हा कचरामुक्त जिल्हा बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येथील जिल्हा नियोजन सभागृहात मंगळवारी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, आठही नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यानंतर आमदार नीतेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मनिष दळवी उपस्थित होते.राणे म्हणाले, सिंधुदुर्गातून प्रतिदिन १८० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यातून पिण्याचे शुद्ध पाणी, गॅस, इंधन उपलब्ध करता येणार आहे. महाराष्ट्राच्या एकूण विजेच्या वापराच्या १० टक्के वीज येथील कचऱ्यापासून सिंधुदुर्गात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. युनिटचे काम सुरू झाल्यानंतर ९ ते १० महिन्यात येथील प्लांट प्रत्यक्षात साकारेल. सिंधुदुर्गातून डिझेलदेखील तयार होणार आहे.येथील इंधन, गॅस अत्यंत कमी दरात मिळणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबवून तेथील सर्व कचरा कंपनीच्या खर्चात उचलला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसून उलट कंपनी आपल्या वार्षिक नफ्याच्या १ टक्का रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार आहे.

येथे जवळपास ५ हजार कोटींची गुंतवणूक कंपनी करणार असून संपूर्ण जिल्ह्याचा कचरा गोळा करून प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ५ एकर जागा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये आज कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन, पाणी उपलब्ध केले जात असल्याचे ते म्हणाले.

...तर देशातील पहिला कचरामुक्त जिल्हाकचरा म्हणजे खरे तर फार मोठी समस्या मानली जाते. मात्र, याच कचऱ्यांचे योग्य नियोजन झाल्यास हा कचरा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदान ठरू शकतो. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी आणि ग्रामपंचायतींनी पुढे येऊन यामध्ये सहभाग दिल्यास सिंधुदुर्ग हा देशातील पहिला कचरामुक्त जिल्हा होईल, असेही राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग