सिंधुदुर्ग : प्रत्येकाने पदाला न्याय द्या :  विकास सावंत, सावंतवाडीतील काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:50 PM2018-04-30T13:50:33+5:302018-04-30T13:50:33+5:30

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सावंतवाडी तालुक्यात मजबूत होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मतदार संघनिहाय विभागीय निरीक्षकांची निवड शनिवारी येथे झालेल्या मासिक बैठकीत करण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाला न्याय द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले.

Sindhudurg: Give everyone justice for the post: Guidance in the meeting of Vikas Sawant, Congress of Sawantwadi | सिंधुदुर्ग : प्रत्येकाने पदाला न्याय द्या :  विकास सावंत, सावंतवाडीतील काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन

काँग्रेसच्या बैठकीत विकास सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजू मसुरकर, बाळा गावडे, राजेंद्र म्हापसेकर, बाबल्या दुभाषी आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देप्रत्येकाने पदाला न्याय द्या :  विकास सावंतसावंतवाडीतील काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन

सावंतवाडी : राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सावंतवाडी तालुक्यात मजबूत होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मतदार संघनिहाय विभागीय निरीक्षकांची निवड शनिवारी येथे झालेल्या मासिक बैठकीत करण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाला न्याय द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले.

येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, प्रांतिक सदस्य जयेंद्र परूळेकर, जिल्हा चिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शहरअध्यक्ष बाबल्या दुभाषी, विभावरी सुकी, अण्णा केसरकर आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विकास सावंत म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पुन्हा बांधणी करायची आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तशी तयारी करायची असून कार्यकर्त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबर पक्ष वाढीसाठी करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मतदार संघनिहाय दहा विभागीय निरीक्षक व चार विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली.

विभागीय निरीक्षकांमध्ये इन्सुली-आबा सावंत, आरोंदा-विजय कुुडतरकर, माडखोल-आनंद परूळेकर, तळवडे-विकास नाईक, मळेवाड-बाळा जाधव, बांदा- रवींद्र म्हापसेकर, कोलगाव-बाळा गावडे, आंबोली-अभय किनळोस्कर, माजगाव-दिगंबर परब, सावंतवाडी-विभावरी सुकी यांची तर विभागीय अध्यक्षांमध्ये संदीप कोठावळे-इन्सुली, प्रसाद मांजरेकर-आरोंदा, रमाकांत राऊळ-माडखोल, विष्णू परब-तळवडे आदीचंी निवड करण्यात आली. यावेळी राजू मसुरकर, बाबल्या दुभाषी आदींनी मार्गदर्शन केले.

प्रदेशाध्यक्ष घेणार नाणारवासीयांची भेट

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, हुसेन दलवाई आदी २ मे रोजी नाणार दौºयावर येत असून ते नाणारवासीयांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकाºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केले आहे.
 

Web Title: Sindhudurg: Give everyone justice for the post: Guidance in the meeting of Vikas Sawant, Congress of Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.