सिंधुदुर्ग : स्वदेश दर्शन व चांदा ते बांदा योजनेच्या अंमल बजावणीसाठी कोकणकिनारपट्टटीवरील पर्यटक उपक्रम स्थानीकांना चालविण्यास देण्याची आनंद हुले यांची मागणी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटनविकासातून स्थानीकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे सुविधा पर्यटन मंडळातर्फे पुरविण्यात येणार आहेत. याच्या अंमल बजावणीसाठी स्थानीक सुशिक्षीत तरूणांना प्राधान्य द्यावे अशी आनंद हुले यांनी विजयकुमार गौतम ( भा. प्र.से) मा. प्रधान सचिव- पर्यटन व सांस्कृतीक खाते यांची मंत्रालयात भेट घेत मागणी केली.
आनंद हुले यांच्या सूचनेचे स्वागत करीत सिंधुदुर्गला पहिला पर्यटक जील्हाचा मान देणारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले विजयकुमार गौतम यांनी महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.विजयदुर्ग, तारकर्ली, तोंडवळी, सागरेश्वर, मोचेमाड,शिरोडा, मिठबाव या पर्यटन स्थळी पर्यटन मंडळातर्फे सुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे पर्यटक फेरीबोट- चालू करण्याची योजना आहे.
सिंधुदुगार्तील पर्यटनाची विवीधता जगात कोठेही अवुभवास मिळत नाही. परंतु कच्चे रस्ते व वाहनांची गैरसोय यामुळे विजयदुर्ग किल्ला, कर्ली खाडी, भोगवे, निवती अशा नितांत सुंदर पर्यटन स्थळांचे दर्शन होत नाही. यासाठी ४० पर्यटक बसतील असा फेरीबोटीचा प्रस्ताव पर्यटन मंडळातर्फे राबविण्यात येणार आहे.वेंगुर्ला राँक येथील निवती दिपगृहावर पर्यटकांसाठी प्रवासी जेटी बांधणे हि मागणी मान्य होऊन जिल्हाधिकार्यांनी पत्तन खात्यास सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहेत. दक्षीण आशीयातील पहीले करण्याचा मान वेंगुल्यार्ला मिळणार आहे. वेंगुर्ला बंदर ते वेंगुर्ला राँक पर्यटक बोटसेवा स्थानीक मच्छिमारांना चालविण्यास देणे. तरंगती हाँटेल- आता पर्यटन मंडळातर्फे विजयदुर्गच्या खाडीत हा आंतरराष्ट्रीय दजार्चा प्रकल्प साकारत आहे.
या योजनेतून विजयदुर्ग बंदराचेही नूतनीकरण होणार आहे. हा आंतरराष्ट्रीय दजार्चा हा प्रकल्प विजयदुर्गच्या स्थानीक सुशिक्षीत तरूणांना चालविण्यास द्यावा ही आमची मागणी आहे. हाऊसबोट- विजयदुर्गच्या खाडीत हा आंतरराष्ट्रीय दजार्चा प्रकल्प साकारत आहे. शेकडो कोटी खर्चूनही नोकरशहांच्या अनास्थेमुळे आतापर्यंत विजयदुर्ग ते वेगुर्ला पर्यटन विकास शून्य असल्याने धोरण बदल्ण्याची गरज आनंद हुले यांनी मागणी केलीडेक्कन ओडीसीचा पांढरा हत्ती ९ वर्षे विनावापरमहाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे गेली अनेक वर्षे पडून असलेल्या सिंधुदुर्ग कोकणकिनारपट्टटीवरील बोटसेवा विनावापर अवस्थेत आहे. कर्ली खाडीत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या अलीशान हाऊसबोट बुडाल्या. मालवण या पर्यटन स्थळी मालवण नगरपरीषदेच्या वाँटर स्कूटर, स्पीड बोट भंगारवस्थेत पडल्या आहेत. पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी ५५ कोटी खर्चून आणलेला डेक्कन ओडिसी नावाचा पांढरा हत्ती गेली ९ वर्षे विनावापर पडला आहे.