शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:05 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यानी स्वतःच्या अकार्यक्षमतेवर केले शिक्कामोर्तब परशुराम उपरकर यांचे कणकवलीत पत्रकार परिषदेत प्रतिपादन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या आमच्या म्हणण्यास त्यांनीच आता दुजोरा दिला आहे.तसेच स्वतःच्या अकार्यक्षमतेवरही त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील तेलीआळी मधील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर म्हणाले, सावंतवाड़ी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर मी निर्बंध ठेवू शकत नाही. तसेच अधिकारी आपणास जुमानत नाहीत. विकासकामासाठी दिलेला निधी अधिकाऱ्यांनी खर्च न केल्याची पालकमंत्री केसरकर यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देवून घरी बसावे.जिल्हा विकासाचा आढावा घेऊन विकास कामे करण्याची जबाबदारी पालकमत्र्यांची असते. मात्र केसरकर यांनी तसे न करता स्वतःचा हट्ट आणि पालकमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हावासीयांना एकप्रकारे वेठीस धरले आहे. सावंतवाडी महोत्सवात मी काय चुकलो असेन तर अभिनेते नाना पाटेकर यांनी माझे कान धरावे अशी मखलाशी त्यांनी केली होती. मात्र , कान धरण्याचा अधिकार जनतेला असून आगामी निवडणुकीत मंत्री केसरकर यांना ती घरी बसविणार आहे.सिंधुदुर्गचा विकास खुंटला असून विकास कामासाठी आलेल्या निधी बाबत माहिती अधिकारात माहिती मागवीली तर निधिच आला नसल्याचे अधिकारी सांगतात. तसेच शासनाची संबधित योजनाच नसल्याचे उत्तर देतात. त्यामुळे नेमकी आकडेवारी मिळत नाही. या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पोरखेळ चालविला आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धूळी मुळे घशाचे, डोळ्याचे तसेच मूत्र पिंडाचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी ठेकेदाराने पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्यांवर खड्डे पडले असून त्याचाही त्रास वाहन चालकाना होत आहे. अपघात होऊ नये यासाठी कोणतीही नियंत्रण यंत्रणा नाही. वृक्षतोड़ बाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्याची माहिती दिली जात नाही.महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता जनतेशी गोड बोलून खोटी माहिती देत आहेत. फक्त आपल्या कामाचा निपटारा करण्याकडे त्यांचा कल आहे. हळूहळू पाणी टँचाई निर्माण होत असून महामार्ग कामासाठी ठेकेदाराला आवश्यक पाणी त्याने लगतच्या धरणातील वापरावे. जवळील नदीवरील पाणी वापरून जनतेला पाण्यापासुन वंचित ठेवू नये. अशा जनतेच्या विविध मागण्यांवर मनसेच्या शिष्ट मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीकसाल येथील कार्यालयात 4 जानेवारी रोजी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित रहावे असे पत्र आपण दिल्याचेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.अन्यथा मनसेचे आंदोलन !महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी जनतेच्या समस्याबाबत चर्चा केली नाही तर कसाल येथील त्यांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर