शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग : आशिये येथे रामकृष्ण करंबेळकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 1:40 PM

कणकवली : आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रोक्त संगीत सभेत सुप्रसिद्ध तबलावादक गुरुवर्य पं. रामदास पळसुले ...

ठळक मुद्देआशिये येथे रामकृष्ण करंबेळकर यांचा सत्कारदोन तास चाललेल्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध

कणकवली : आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रोक्त संगीत सभेत सुप्रसिद्ध तबलावादक गुरुवर्य पं. रामदास पळसुले यांच्या तबला वादनाने रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. यावेळी हरकुळ बुद्रुक येथील तबला वादक रामकृष्ण उर्फ प्रसाद करंबेळकर यांचा पं.रामदास पळसुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या माध्यमातून कलेच्या क्षेत्रात रामकृष्ण परुळेकर यांनी केलेल्या विशिष्ट कार्याबद्दल संगीत मीत्र परीवाराकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.आशिये येथील श्री दत्त क्षेत्र मधील रविवारची संध्याकाळ संगीत रसिकांसाठी संस्मरणीय अशीच ठरली. आकाशवाणी 'अ' श्रेणी प्राप्त रामकृष्ण करंबेळकर यांचा गंधर्व फाउंडेशन व संगीत रसिक मित्र परिवार यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. रामकृष्ण करंबेळकर याना तबला वारसा घरातूनच मिळाला.

हरकुळचे चव्हाण गुरुजी यांच्या कडून मार्गदर्शन घेऊन पुढे पुणे येथे पं .रामदास पळसुले यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्यांनी जोमाने तबला वादनाची वाटचाल सुरु ठेवली. अनेक मैफिली, संमेलनात तसेच देश विदेशात नामवंत गायक , वादक , कीर्तनकार याना साथ करुन अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत.अलीकडेच त्याना आकाशवाणीची मान्यताप्राप्त 'अ' श्रेणी मिळाली आहे.त्यानिमीत्ताने कौतुकाची थाप म्हणून गंधर्व परिवार तसेच गुरुवर्य बाळ नाडकर्णी,दत्त क्षेत्र आशिये कमिटी , आदर्श संगीत विद्यालय,विश्रांती कोयंडे, स्वरांगण, ऋतं संगीत विद्यालय, विजय कात्रे,प्रशांत बुचडे ,गुरुनाथ केळुसकर,सुहास खानोलकर, संदीप ठाकूर,बापू डंबे,दामोदर खानोलकर,डॉ समीर नवरे,विलास खानोलकर, राजू करंबेळकर, अभय खडपकर,मनोज मेस्त्री,गिरीश सावंत,श्याम सावंत,किशोर सोगम,संतोष सुतार,सागर महाडिक यानी हा कौतुक सोहळा आयोजीत केला होता.रामकृष्ण करंबेळकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आपल्या जवळच्या आणि संगीत क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आपण भारावून गेल्याचे सांगितल. तसेच आईवडिल, गुरुजन, कुटुंबीय,रसिक श्रोते यांच्या आशीर्वादाने आपण घडलो असल्याचेही ते म्हणाले.यावेळी करंबेळकर यांचे आईवडिल व पत्नी वैदेही यांना तेजस्विनी पेंडुरकर व संदीप पेंडुरकर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्यानंतरच्या सत्रात पं.रामदास पळसुले यांचा डॉक्टर समीर नवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसाद घाणेकर यानी ओघवत्या शैलीत घेतलेल्या मुलाखतीला पंडितजीनी मनस्वी उत्तरे दिली.तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांचे मार्गदर्शन, तबला इतिहास तसेच दिल्ली, फरुखाबाद, लखनौ, पंजाब आदी तबला घराण्यांची वैशिष्ठये याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. कलाकार घडण्यासाठी गुरु सहवास, गुरु शिष्य परंपरा आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर त्यानी तबला एकलवादन सादर केले.बोल,तोडे,कायदे,चक्रधार आदी नाद आविष्कारानी रसिक मंत्रमुग्ध झाले.सुमारे दोन तास चाललेल्या या मैफलीने रसिकाना अभूतपूर्व अनुभूती दिली .यावेळी पुणे येथील अदिती गराडे यांची संवादिनीवरील लेहरा साथ ही कौतुकाचा विषय ठरली. यावेळी गंधर्व फाउंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांच्या हस्ते अदिती व ध्वनीव्यवस्थापक बाबू गुरव यांचाही सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अभय खडपकर तर आभारप्रदर्शन प्रसाद घाणेकर यानी केले.रौप्य महोत्सवी गंधर्व सभा 27 रोजीगंधर्व फाऊंडेशनच्यावतीने रौप्य महोत्सवी गंधर्व संगीत सभा 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली असून शिल्पा डुबळे (गोवा) या सुप्रसिद्ध तबला वादक रोहिदास परब यांच्या साथीने ही मैफिल सजवणार आहेत. यावेळी रसिकानी उपस्थित रहावे असे आवाहन गंधर्व फाऊंडेशन तर्फे करण्यात आले. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग