सावंतवाडी - रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.सावंतवाडी व बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक दुकाने खाली करावी लागली आहेत.यात बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पासून जोरदार पाऊस कोसळत आहे.रविवारी तर पावसाने आणखी जोर धरला असून तालुक्यात तर चांगलाच हाहाकार उडाला आहे.तेरेखोल नदीने आपली धोक्याची पातळी ओलडली असल्याने वाफोली बांदा दाणोली मार्गावर पाणी आले आहे.यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.रविवारी पहाटेपासूनच न थांबता जोरदार पाऊस सुरु आहे. यातून जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांनी घरातून बाहेर निघणे टाळले आहे. अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत,वाहतुकही ठप्प झाली आहे. काहि गावात तर सकाळपासूनच वीजही गायब झालेली आहे.
सकाळच्या सुमारास दाणोली बांदा मार्गावर तेरेखोल नदीचे पाणी आल्याने दोन्ही बाजू ने वाहतूक थांबवून ठेवण्यात आली पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी बॅरेकटिग केले असून दोन्ही बाजूला पोलिस ठेवण्यात आले आहेत तेरेखोल नदी ची धोक्याची पातळी वाढत जाणार तसतशी इन्सुली सह काहि गावात पाण्याची पातळी वाढत जाणार आहे.मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली येथे तर दोन्ही बाजूला पाणी आले आहे.तसेच बांदा बाजारपेठेत ही पाणी वाढत चालले असून अनेकानी सावधगिरीचा इशारा म्हणून दुकाने खाली करण्यास सुरूवात केली आहे.शेर्ले परिसरात ही पाण्याची पातळी वाढू लागली आहे.तसेच माडखोल येथे ही तेरेखोल नदीचे पाणी केव्हाही पातळी ओलडू शकते त्यामुळे तेथील ग्रामस्थांना सर्तक राहाण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महसूल विभाग व पोलिस यांच्याकडून सतत परस्थीतीवर लक्ष ठेवण्यात येत असून कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. सावंतवाडी पोलिसांनी दाणोली परिसरात जाऊन वाहतूक थांबवली आहे.
सावंतवाडी बाजारपेठेत पाणीच पाणीकधीही नाही ते यावेळी सावंतवाडी बाजारपेठेत पाणी घुसले असून अनेक दुकानात पाणी गेले आहे.काहि दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानातील सामान इतरत्र हलविले आहे.रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून गांधी चौकात तर अनेक गाड्या या पाण्यात आहेत पाणी जाण्यास वाट नसल्याने पाणी तेथेच तुडुंब राहिले आहे.काहि दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक दुकानात पाणी जाणार आहे.नगरपरिषद कर्मचारी पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न करत आहेत असे असले तर पाण्याची पातळी कमी होतना दिसत नाही त्यातच मोती तलावातील पाणी ही वाढत चालले आहे.