सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणूक सक्षमपणे लढविणार, महिंद्र सावंत यांचे आश्वासन, मुंबई येथील काँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:09 PM2018-01-15T15:09:23+5:302018-01-15T15:14:58+5:30
कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सक्षमपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सक्षमपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत यांनी दिली आहे.
मुंबई-दादर येथील टिळक भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप, आमदार हुस्नबानू खलिफे, माजी आमदार विजय सावंत, सरचिटणीस राजन भोसले, दत्ता नरे, माजी आमदार सुभाष चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत, कणकवली शहर अध्यक्ष विलास कोरगावकर, आतिश जेठे, निखिल गोवेकर, निलेश मालंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच काँग्रेसची कणकवली तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी याबाबतही पूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
यावेळी सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडून सवोर्तोपरी सहकार्य करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.