मालवण : तुटपुंजे कमिशन आणि ई-पॉस मशिनसाठी लागणारी इंटरनेट सुविधा यामुळे सध्या केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. मालवण तालुक्यातील केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर केरोसिन वितरित करीत आहेत. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवार २७ आॅगस्ट रोजी तालुक्यातील केरोसिन दुकानदारांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.मालवण तालुका केरोसिन दुकानदारांची बैठक भरड येथील श्री दत्तमंदिर येथे झाली. या बैठकीस मालवण तालुका धान्य व केरोसिन संघटनेचे अध्यक्ष सुनील मलये, तालुका सचिव अमित गावडे, सल्लागार अरविंद नेवाळकर तसेच ४५ केरोसिन दुकानदार उपस्थित होते.यावेळी बैठकीत पहिल्यापेक्षा आता मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून गॅस सिलिंडर शिधापत्रिकेवर घेतला तर त्या शिधापत्रिकेला शासनाकडून केरोसिन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केरोसिन वितरकांचा शासनाकडून मिळणारा केरोसिनचा कोटा कमी झालेला आहे. त्यामुळे केरोसिन वितरकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ह्यना नफा, ना तोटाह्ण या तत्त्वावर केरोसिन वितरण करत आहे. परंतु ही समाजसेवा सध्या त्यांना खूपच डोईजड बनत चालली आहे. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यासाठी सोमवार २७ रोजी तालुक्यातील सर्व केरोसिन दुकानदारांची बैठक घेण्यात येणार आहे, असे यावेळी ठरविण्यात आले.ई-पॉस मशिन ठरतेय डोकेदुखीशासन सध्या रेशन धान्याप्रमाणे केरोसिनचेही वितरण ई-पॉस मशिनवर करीत आहे. त्यामुळे सध्या दुकानदारांना प्रति लिटर केरोसिनला ५१ पैसे कमिशन मिळते. एवढे तुटपुंजे कमिशन व त्याचबरोबर ई-पॉस मशिनला लागणारी इंटरनेट व्यवस्था त्यामुळे केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सिंधुदुर्ग : केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत, मालवणमध्ये २७ आॅगस्टला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:09 PM
तुटपुंजे कमिशन आणि ई-पॉस मशिनसाठी लागणारी इंटरनेट सुविधा यामुळे सध्या केरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. मालवण तालुक्यातील केरोसिन दुकानदार सध्या समाजसेवा समजून ह्यना नफा, ना तोटाह्ण या तत्त्वावर केरोसिन वितरित करीत आहेत. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवार २७ आॅगस्ट रोजी तालुक्यातील केरोसिन दुकानदारांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
ठळक मुद्देकेरोसिन दुकानदार आर्थिक अडचणीत, मालवणमध्ये बैठक पुढील दिशा ठरविण्यासाठी २७ आॅगस्टला बैठकीचे आयोजन