Ganesh Chaturthi 2018 : सिंधुदुर्ग : लाडक्या गणरायाचे थाटात आगमन, देवगडातील ग्रामीण भाग गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:02 PM2018-09-14T17:02:02+5:302018-09-14T17:06:02+5:30

देवगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरणात घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताच्या आगमनाने भक्तगण सुखावून गेला आहे.

Sindhudurg: Ladki Ganaraya arrives at Thatta, the rural part of Goddess Gajabajala | Ganesh Chaturthi 2018 : सिंधुदुर्ग : लाडक्या गणरायाचे थाटात आगमन, देवगडातील ग्रामीण भाग गजबजला

Ganesh Chaturthi 2018 : सिंधुदुर्ग : लाडक्या गणरायाचे थाटात आगमन, देवगडातील ग्रामीण भाग गजबजला

Next
ठळक मुद्देलाडक्या गणरायाचे थाटात आगमन, देवगडातील ग्रामीण भाग गजबजला, देवगड तालुक्यामध्ये भक्तीमय वातावरण

सिंधुदुर्ग : तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरणात घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताच्या आगमनाने भक्तगण सुखावून गेला आहे. अगरबत्तींचा सुहास, मृदंग टाळांचा खणखणाट व भजनी गीतांच्या वातावरणात देवगड तालुक्यातील ग्रामीण भाग गजबजून गेला आहे. तालुक्यात गुरुवारी लाडक्या गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

देवगड तालुक्यातील मुंबई, वाशी येथील चाकरमानी हजारोेंच्या संख्येने गणेश उत्सवासाठी रेल्वे, खासगी गाड्या व एसटीने गावी आले आहेत. गणेशोत्सवाला गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्र्ण, जल्लोषपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. काही ठिकाणी गणेशमूर्ती गुरुवारी सकाळपासून घरी वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत नेण्यात आल्या.

ठिकठिकाणी गणेशोत्सवाची सुरूवातही पहाटेपासूनच लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या गीतानेच करण्यात आली. देवगडमधील बाजारपेठ ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने गजबजली. देवगडमध्ये मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांमुळे बाजारपेठेत उत्सवाच्या आधीच दोन दिवस गर्दी उसळली होती. विविध डिझाईनची कापडी मखरे, विद्युत साहित्य, गणेशपुजेसाठी लागणारे साहित्य, फटाके, नैवेद्यासाठी लागणारे विविध पदार्थ, रंगसामान, तोरणे आदींनी बाजारपेठ सजली होती.

होमगार्ड, पोलिस तैनात

गणेशोत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून देवगड पोलीस स्थानकात पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड देण्यात आले आहेत. शिरगाव, मिठबांव, जामसंडे, देवगड एसटी स्टॅण्ड, बाजारपेठ येथे पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवस रात्र सतत गस्त घालण्याचे काम पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.

 

 

Web Title: Sindhudurg: Ladki Ganaraya arrives at Thatta, the rural part of Goddess Gajabajala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.