दोडामार्ग : येथील बाजारपेठेतील सोनू-सुधा कॉम्प्लेक्समधील दीप फोटो स्टुडिओ कटावणीच्या सहाय्याने फोडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी निकॉन कंपनीच्या दोन कॅमेऱ्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीड महिन्यापूर्वी मालवण, बांदा व कुडाळ येथे फोटो स्टुडिओ फोडण्यासाठी चोरट्यांनी जी पध्दत अवलंबिली होती, तीच पध्दत या चोरीतही वापरण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.येथील बाजारपेठेतील सोनू-सुधा कॉम्प्लेक्समध्ये संदीप देसाई यांचा दीप फोटो स्टुडिओ आहे. गेल्या चार वर्षांपासून हा फोटो स्टुडिओ येछे कार्यरत आहे.मात्र, तो मंगळवारी मध्यरात्रीनंतर फोडण्यात आला. देसाई यांना फोटो स्टुडिओ फोडण्यात आल्याची माहिती मिळताच ते तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने शटरचे गज वाकवून आतमधील काचेचा दरवाजा फोडला.या चोरीत निकॉन कंपनीचे ३२ हजार व ६८ हजार रूपयांचे दोन कॅमेरे, २८ हजार रूपयांचा लेनेवो लॅपटॉप, ४५ हजार रूपयांचा कॉम्प्युटर, डेल कंपनीचा १२ हजार रूपयांचा डेक्सटॉप, १८०० रूपयांची ३२ जीबीची दोन मेमरी कार्ड, १६ जीबीची १२०० रूपयांची तीन मेमरी कार्ड, १२ हजार रूपयांचा कॅनॉन प्रिंटर असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.याबाबत देसाई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा केला.कुडाळ, बांदा पाठोपाठ दोडामार्ग लक्ष्यदीड महिन्यांपूर्वी कुडाळ व बांदा येथे चोरट्यांनी फोटो स्टुडिओ फोडून किंमती कॅमेरे व इतर साहित्याची चोरी केली होती. त्यानंतर काही काळ चोरटे शांत होते. मात्र, पुन्हा एकदा चोरट्यांनी दीप फोटो स्टुडिओ फोडण्यासाठी वापरलेली पद्धत एकच असल्याने खळबळ उडाली आहे.श्वानपथकाला पाचारणपोलिसांनी सिंधुदुर्ग येथून श्वानपथकाला पाचारण केले. सायंकाळी उशिरा श्वानपथक दोडामार्गमध्ये दाखल झाले. मात्र ते कॉम्प्लेक्सच्या परिसरातच घुटमळत राहिल्याने चोरट्यांचा छडा सायंकाळपर्यंत लागू शकला नाही.