चौके : शासनाच्या बजेट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्ते दुरुस्ती कामांचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश नाईक यांनी ठेकेदारांना दिले आहेत.मालवण-कुडाळ मार्गावर चौके ते नेरूरपार या दरम्यान सर्वाधिक खड्डेमय बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यात रस्त्याचे खडीकरण, कार्पेट डांबरीकरण व आवश्यक त्याठिकाणी मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षे रस्त्याची देखभाल- दुरुस्ती ठेकेदाराची राहणार आहे.मालवण-बेळणे मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच काळसे-कट्टा-गुरामवाड- वडाचापाट-मसदे मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण यासाठी दोन कोटी मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजनही आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख देवयानी मसुरकर, उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, पेंडूर विभागप्रमुख परशुराम उर्फ अण्णा गुराम, शाखाप्रमुख राजू परब, उमेश प्रभू, संतोष परब, अशोक प्रभू, विजय प्रभू, स्वरूपानंद प्रभू, शिवा भोजने, प्रवीण लुडबे, संतोष गुराम, दर्शन म्हाडगुत, पोईप सरपंच गिरीजा पालव, गोळवण सरपंच प्रज्ञा चव्हाण, विजय पालव, महेश शिरपुटे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : मालवणात बजेटमधील रस्त्यांची भूमिपूजने, सहा कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:47 PM
शासनाच्या बजेट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्ते दुरुस्ती कामांचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश नाईक यांनी ठेकेदारांना दिले आहेत.
ठळक मुद्देमालवणात बजेटमधील रस्त्यांची भूमिपूजने, सहा कोटी रुपये मंजूर वैभव नाईक यांनी केला रस्ताकामाचा शुभारंभ