सिंधुदुर्ग : भारतासारख्या प्रगत देशात सामाजिक उपक्रमाला जोडून लुपीन फाऊंडेशन करत असलेले कार्य अलौकिक असे आहे. त्याचे सर्व श्रेय हे देशबंधू गुप्ता यांना जाते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले.
भविष्यात या कार्यात इफ्को फर्टिलायझर या कंपनीचा मदतीचा हात असेल, असे आश्वासन आॅर्गनिक उत्पादन निर्मिती करणाºया इफ्को फर्टिलायझर कंपनीचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेश-रायबरेली संस्थानचे राजे कौशल्येंद्र सिंह यांनी दिले.लुपीन ह्युमन वेलफेअर असोसिएशन अँड रिसर्च फाऊंडेशन सिंधुदुर्गचा ३१ वा वर्धापन दिन येथील बॅ. नाथ पै सभागृहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष बबन साळगावकर, लुपीनचे व्यवस्थापक योगेश प्रभू, नाबार्डचे टी.डी.एम. अजय थोटे, बाळकृष्ण पांचाळ, माविम संचालिका सीमा गावडे, आनंद मेस्त्री, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, महेशकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लुपीनचे कार्य योगेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे सुरु आहे.
त्याकाळी बचतगटाची संघटना स्थापन करताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. या भागाचे तत्कालीन खासदार विद्यमान केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ही मेहनत घेतली. त्यामुळे जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन उभे राहिले. या भागात बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्यानंतर सुरेश प्रभू यांचे नाव घ्यावे लागेल. बचतगटांच्या माध्यमातून मोठे व्यवसाय सुरू झाले तर रोजगाराची मोठी संधी निर्माण
२२ बचतगट समुहांचा प्रमाणपत्र देवून गौरवयावेळी नाबार्डचे टीडीएम अजय थोटे यांनी लुपीन फाऊंडेशन व नाबार्ड गेली वीस वर्षे एकत्र काम करत आहेत. लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना, आंबोली घाटात स्प्रिंग शेड आदी प्रकल्पांसह महिलांसाठी अनेक योजना लुपीन फाऊंडेशन व नाबार्डच्या माध्यमातून राबवणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील २२ समूह बचतगटांचा तसेच वेंगुर्ले-कुशेवाडा ग्रामपंचायत यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.लुपीन ह्युमन वेलफेअर असोसिएशन अँड रिसर्च फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन कौशल्येंद्र सिंह यांंच्या हस्ते झाले. यावेळी बबन साळगावकर, योगेश प्रभू, अजय थोटे, बाळकृष्ण पांचाळ, सीमा गावडे आदी उपस्थित होते.