सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील तेर्सेबांबडे-मळावाडी व पिंगुळी धुरी टेंबनगर साईमंदिर येथे बॉक्सवेल बांधण्यात यावेत, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांची भेट घेऊन केली. या दोन्ही ठिकाणी बॉक्सवेल होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी राणे यांनी दिले.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात काही ठिकाणी उंच भराव असलेला महामार्ग करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गावांचे विभाजन झाले असून, गावातील देवालये, शेती, सार्वजनिक स्थळे दोन भागात विभागली गेली आहेत. त्यामुळे महामार्गावरून दुसरीकडे जाताना ग्रामस्थांना त्याचा कायमच त्रास सहन करावा लागणार आहे.तेर्सेबांबर्डे-मळावाडी व पिंगुळी धुरी टेंबनगर येथील ग्रामस्थानांही ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे बॉक्सवेल होण्याच्या मागणीसाठी दोन्ही गावातील रहिवाशांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांची भेट घेतली व आपली समस्या सांगितली. यावेळी राणे यांनी ग्रामस्थांच्या मागणीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाध्यक्ष दीपक नारकर, लोकसभा युवक अध्यक्ष विशाल परब, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, रुपेश कानडे, ग्रामपंचायत सदस्या उदया धुरी, संकेत धुरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : बॉक्सवेल होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू : निलेश राणे यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:08 PM
मुंबई-गोवा महामार्गावरील तेर्सेबांबडे-मळावाडी व पिंगुळी धुरी टेंबनगर साईमंदिर येथे बॉक्सवेल बांधण्यात यावेत, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांची भेट घेऊन केली. या दोन्ही ठिकाणी बॉक्सवेल होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी राणे यांनी दिले.
ठळक मुद्देबॉक्सवेल होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू : निलेश राणे यांचे आश्वासनमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण