शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

सिंधुदुर्ग : गतीरोधकावरुन पडून एक ठार, आजपर्यंत दोघांचे गेले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 8:13 PM

तोरसे (गोवा) येथून आपल्या सावंतवाडी येथील भावाकडे दुचाकीवरून जात असताना बांदा-कट्टा कॉर्नर येथील गतिरोधकावर गाडी उसळल्याने झालेल्या अपघातात राहुलकुमार अरुणकुमार सिंह (२२, रा. राजखंड, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला. जीवघेण्या स्पीडब्रेकरमुळे आतापर्यंत याठिकाणी १० हून अधिक अपघात झाले आहेत.

ठळक मुद्देगतीरोधकावरुन पडून एक ठार, आजपर्यंत दोघांचे गेले प्राण बांदा कट्टा कॉर्नर येथील गतिरोधक ठरतोय अपघातांना निमंत्रण

बांदा : तोरसे (गोवा) येथून आपल्या सावंतवाडी येथील भावाकडे दुचाकीवरून जात असताना बांदा-कट्टा कॉर्नर येथील गतिरोधकावर गाडी उसळल्याने झालेल्या अपघातात राहुलकुमार अरुणकुमार सिंह (२२, रा. राजखंड, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला. जीवघेण्या स्पीडब्रेकरमुळे आतापर्यंत याठिकाणी १० हून अधिक अपघात झाले आहेत. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारल्यानंतर शनिवारी हा स्पीडब्रेकर काढून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी राहुलकुमार हा फरशी बसविण्याचे काम करत होता गेले काही दिवस तो तोरसे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. गुरुवारी होळीची सुटी असल्याने तो व त्याचा आतेभाऊ यांनी दुपारी होळी साजरी केली. जेवण वगैरे झाल्यानंतर आराम करून रात्री ते गोवा येथील एका हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करण्यासाठी गेले होते.रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राहुलकुमार हा पुत्तलकुमार मंचन साहनी यांच्या मालकीची दुचाकी (जीए ०८ एल ९०५१) घेऊन सावंतवाडी येथील भावाकडे जाण्यासाठी निघाला. दरम्यान, बांदा कट्टा कॉर्नर सर्कल येथे नव्याने घालण्यात आलेल्या उंच गतिरोधकाचा त्याला अंदाज न आल्याने वेगातच त्याची दुचाकी उडून रस्त्यावर आदळली. त्याबरोबर राहुलकुमारही रस्त्यावर आदळला. अपघात घडल्याचे समजताच येथे उपस्थित स्थानिकांनी त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले.बिहार येथून हे सेंट्रींग कामगार बांदा परिसरात आले होते. होळी साजरी करून दुसऱ्या दिवशी रंगपंचमीसाठी भावाला बोलावण्यासाठी जाणाऱ्या राहुलवर काळाने घाला घातला. ही बातमी त्याच्या भावाला समजताच त्याने तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यावेळी त्याने राहुल याच्या मृतदेहाला कवटाळून फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून गेला.दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी डॉ.पाटील यांनी सांगितले की, मृत राहुल याच्या छातीला मुका मार लागला होता. श्वासनलिकेत रक्त साकळले होते. तोंडाला उजव्या बाजूला व खांद्याला जखम होती. मात्र, कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत डोक्याला किंवा अन्य शरीरावर दिसून आली नाही.

याबाबतचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून रक्तही तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. बांदा पोलीस प्रसाद कदम यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बांदा येथील शिवसेना पदाधिकारी निखिल मयेकर यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारल्यानंतर शनिवारी स्पीडब्रेकर काढण्याचे आश्वासन दिले. हा स्पीडब्रेकर चुकीच्या पद्धतीने घालण्यात आल्याचे अभियंता शेडेकर यांनी मान्य केले.मृत राहुलकुमार सिंह

कट्टा कॉर्नर सर्कल येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात होणारे संभाव्य अपघात टळले आहेत. मात्र, गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर टाकण्यात आलेला गतिरोधक जास्त उंचीचा आहे. त्यामुळे गोव्यातून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नाही. त्यामुळेच याठिकाणी अपघात सातत्याने होत आहेत. आलिशान गाड्यांंची या गतिरोधकामुळे मोठे नुकसान होत आहे. दोनच दिवसांपूर्वी एक गाडीची दर्शनी व मागची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी असणाऱ्या गतिरोधकाची उंची कमी करून योग्य त्या उंचीचा गतिरोधक बसवावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग