शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

सिंधुदुर्ग : वैद्यकीय अधिकारीही आंदोलनात सहभागी होणार, एनआरएचएमचे आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 4:24 PM

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशीही सुरू होते.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारीही आंदोलनात सहभागी होणारएनआरएचएमचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरुच

ओरोस : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील एनआरएचएमचे कर्मचारी व अधिकारी यांनी १२ एप्रिलपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशीही सुरू होते.

या आंदोलनाची तीव्रता वाढत असून एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. २१ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास या कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.एनआरएचएम कर्मचाऱ्याना विनाअट शासनसेवेत सामावून घ्यावे, सेवेतील अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्याना शासनाच्या सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी असलेली वयाची अट शिथिल करावी, कामावर आधारित सुधारित गुण पद्धत बंद करावी. समान काम-समान वेतन कायदा लागू करावा, आरोग्य विभागाचे खासगीकरण करू नये, सेवेतील महिला कर्मचाºयांना १८० दिवसांची गरोदर व प्रसुती रजा द्यावी, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी या कर्मचाऱ्यानी सुरू केलेले कामबंद आंदोलन बुधवारी सातव्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाला बुधवारी खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. २१ रोजी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला आपण स्वत: व आमदार नाईक उपस्थित राहून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही दिली.या आंदोलनात आम्ही वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. २१ रोजी होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास आम्ही या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेऊ. तूर्तास आम्ही अतितत्काळ रुग्ण सेवा देत असून बाह्य रुग्ण सेवा पूर्णत: बंद केली असल्याचे डॉ. कृपा गावडे यांनी स्पष्ट केले.रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही : डॉ. साळेकामबंद आंदोलनात एनआरएचएम कर्मचारी सहभागी असले तरी नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा रुग्ण सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्यास रुग्ण सेवेवर नक्कीच परिणाम होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य