सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत विजेची समस्या उद्भवत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी उर्जा विभागाचे सचिव गणेश चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्गमध्ये येणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विद्युत विभागाची बैठक होणार आहे. याबाबत नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर यांची बैठक पार पडली. यावेळी या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी उर्जा विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी सिंधुदुर्गचा खास आढावा घेतला. तसेच येथील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार याचीही माहिती घेतली. पालकमंत्री केसरकर यांनीही सिंधुदुर्गमध्ये अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच अनेक गावात वायरमनच्या समस्या आहेत. जुने साहित्य असल्याने ते बदलून मिळत नाही, अशा तक्रारी सांगितल्या.यावर उर्जामंत्र्यांनी गणेश चतुर्थीपूर्वी विजेच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. उर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सचिव गणेश चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जाणार असून, तेथे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत आणि समस्या सोडवतील. चतुर्थीच्या काळात विजेच्या समस्या उद्भवणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल, असेही केसरकर यांना उर्जामंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.विजेच्या लपंडावामुळे ग्राहक हैराणसिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत विभागाच्या मोठ्या समस्या आहेत. सर्वच तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. वेळोवेळी ग्राहकांना तसेच राजकीय पक्षांना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलने करावी लागत आहेत. त्यामुळे ग्राहकात संताप आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत खास बैठकीचे आयोजन शुक्रवारी केले होते.
सिंधुदुर्ग : वीज समस्या चतुर्थीपूर्वी सोडविणार, ऊर्जामंत्र्यांसमवेत केसरकरांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:52 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत विजेची समस्या उद्भवत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी उर्जा विभागाचे सचिव गणेश चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्गमध्ये येणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विद्युत विभागाची बैठक होणार आहे.
ठळक मुद्देवीज समस्या चतुर्थीपूर्वी सोडविणार, ऊर्जामंत्र्यांसमवेत केसरकरांची बैठक ऊर्जा विभागाचे सचिव लवकरच जिल्ह्यात