शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सिंधुदुर्ग : दिवाळीसाठी कोकण रेल्वेच्या जादा गाड्या, २ नोव्हेंबरपासून मार्गावर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:45 PM

कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यानुसार ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर विशेष गाडी (०१०३७/०१०३८) धावणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीसाठी कोकण रेल्वेच्या जादा गाड्या२ नोव्हेंबरपासून मार्गावर धावणार, २ विशेष गाड्यांचे नियोजन

सिंधुदुर्ग : दिवाळीसाठीकोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. २ नोव्हेंबरपासून या गाड्या या मार्गावरून धावणार आहेत. तर दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यानुसार ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर विशेष गाडी (०१०३७/०१०३८) धावणार आहे.ही गाडी रात्री १ वाजून १० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास त्याच दिवशी म्हणजे ५, १२ व १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीहून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी तो लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबे घेत सावंतवाडीला विसावणार आहे.दुसरी विशेष गाडी लोकमान्य टर्मिनस ते थिवी (०१०४५/०१०४६) मार्गावर २, ९ व १६ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी २२ एलएचबी डब्यांसह धावणार आहे. वातानुकूलित, स्लीपर तसेच सर्वसाधारण श्रेणीचे डबे या गाडीला जोडण्यात येणार आहेत.

ही गाडी लोकमान्य टर्मिनसहून रात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.५० वाजता ती गोव्यात थिवी स्थानकावर पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास थिवी स्थानकावरून दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी तो मुंबईत लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.प्रवाशांत समाधानया विशेष गाड्यांमुळे दिवाळीच्या कालावधीत कोकणात येणाऱ्या मुंबईकर मंडळींची सोय होणार आहे. प्रवासाच्या दृष्टीने त्यांना या गाड्या सोईस्कर ठरणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेDiwaliदिवाळीsindhudurgसिंधुदुर्ग