ठळक मुद्देमाकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती जिल्ह्यात मलेरियाचे ४१ तर डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले
सिंधुदुर्गनगरी : जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंतयावर्षीपासून डेंग्यू व लेप्टोच्या स्पॉट टेस्ट घेणे बंद केले असून अशा रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत व खलिपे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. टी. जगताप, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कीटकजन्य आजारांसाठी पावसाळी हंगाम जोखमीचा आहे. कीटकजन्य आजारात वाढ होऊ नये यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाते. मात्र, तरीही जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते अद्यापपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे १३ रूग्ण आढळून आले आहेत तर माकडतापाचे १०९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मलेरियाचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत.क्षयरोग रुग्णांना मिळणार संधीराष्ट्रीय सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. योग्य उपचाराबरोबर सकस व प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून नि-क्षय पोषण योजनेंतर्गत प्रत्येक क्षयरूग्णास दरमहा ५०० रूपये सकस आहार निधी रूग्णाच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये रूग्णास उपचार सुरू करताना, दुसरा हप्ता १ हजार रुपये दोन महिने पूर्ण केल्यावर, तर शेवटचा हप्ता उपचार पूर्ण झाल्यावर एक हजार रुपये दिला जाणार आहे., अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी वाय. बी. कांबळे यांनी दिली.स्पॉट टेस्ट बंदपूर्वी डेंग्यू किंवा लेप्टोची लक्षणे एखाद्या रुग्णास आढळल्यास त्यांची स्पॉट टेस्ट केली जात होती. मात्र, शासनाने आता स्पॉट टेस्टवर बंदी घातली आहे. या दोन आजारांच्या रूग्णांची आता यापुढे जिल्हा रूग्णालयात ब्लड टेस्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालयात लॅब सुरू होणारसावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ व दोडामार्ग या चार तालुक्यातील रूग्णांची मनिपाल या संस्थेत मोफत तपासणी केली जाते. तर उर्वरित चार तालुक्यांसाठी जिल्हा रूग्णालयात लॅब सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इमारत व सर्व यंत्रणा उपलब्ध झाली असून मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास लवकरच या लॅबचा शुभारंभ करता येईल, असे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले.