शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

सिंधुदुर्ग :  महिला भगिनींना रोजगार देणे माझे कर्तव्य: दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 1:06 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला भगिनींना रोजगार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. काथ्या व्यवसायामुळे महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. तुळससारख्या काथ्या सुविधा केंद्रांतर्गत १०० महिलांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार देण्यात येणार आहे. महिलांना दोरी बनवायच्या मशीन देऊन घरच्या घरी दोरी बनवून ती पुन्हा महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळसमार्फत विकत घेतली जाणार आहे. त्यामुळे गरीब महिलांच्या घरी लक्ष्मी नांदणार आहे, असा विश्वास मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमहिला भगिनींना रोजगार देणे माझे कर्तव्य: दीपक केसरकरतुळस येथे काथ्या प्रक्रिया उद्योग सामूहिक केंद्राचा शुभारंभ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला भगिनींना रोजगार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. काथ्या व्यवसायामुळे महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. तुळससारख्या काथ्या सुविधा केंद्रांतर्गत १०० महिलांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार देण्यात येणार आहे. महिलांना दोरी बनवायच्या मशीन देऊन घरच्या घरी दोरी बनवून ती पुन्हा महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळसमार्फत विकत घेतली जाणार आहे. त्यामुळे गरीब महिलांच्या घरी लक्ष्मी नांदणार आहे, असा विश्वास मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.चांदा ते बांदा योजनेअंतर्गत रिसोर्स बेस्ड इंटेसिव प्लानिंग अँड डेव्हलपमेंट पथदर्शी प्रकल्प अंतर्गत काथ्या प्रक्रिया उद्योग सामूहिक केंद्र्राचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील तुळस व सावंतवाडीतील सांगेली या ठिकाणी करण्यात आला. यावेळी काथ्या मशिनचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, माजी सभापती बाळू परब, तुळस सरपंच शंकर घारे, मातोंड सरपंच जान्हवी परब, रणजित सावंत, लघू उद्योग महामंडाळचे राजेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक तसेच तुळस ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्यात १२ काथ्या प्रक्रिया केंद्रेपालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेली ३ वर्षे अथक प्रयत्नांनंतर चांदा ते बांदा योजनेतून काथ्या उद्योग समूह स्थापन करून लघू उद्योग महामंडळ अंतर्गत हा प्रकल्प सुरू केला. त्यांनी फक्त घोषणा केली नाही, तर प्रत्यक्षात आणले आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ काथ्या प्रक्रिया केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, रोजगाराचे दालन उपलब्ध झाल्याने महिलांना आता घरबसल्या रोजगार मिळणार आहे. महिलांनी बनविलेले उत्पादन घेऊन तो स्वत: लघु उद्योग महामंडळ विक्री करणार आहे. त्याचा मोबदला ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना मिळणार आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गwomen and child developmentमहिला आणि बालविकास