शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

सिंधुदुर्गनगरी : प्रकाश मांजरेकरला दोन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 6:47 PM

एका विवाहितेला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा घोगळवाडी येथील प्रकाश सोनू मांजरेकर (४३) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देप्रकाश मांजरेकरला दोन वर्षांचा सश्रम कारावासविवाहितेला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : एका विवाहितेला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा घोगळवाडी येथील प्रकाश सोनू मांजरेकर (४३) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.विवाहिता ७ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी १२.३० ते १ या वेळेत घरातील चुलीवर जेवण करीत असताना मद्यपान करून आरोपी प्रकाश मांजरेकर तेथे आला. यावेळी त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या अंगावर रॉकेल ओतले. हे रॉकेल चुलीमध्ये पडले. त्यामुळे आगीचा भडका उडाला. यात ती विवाहिता गंभीर भाजली होती.

विवाहितेच्या तक्रारीनुसार मांजरेकर यांच्यावर भा.द. वी. कलम ३०७ नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश तिडके यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.

न्यायालयाने एकूण ११ साक्षीदार तपासले. यात तक्रारदार त्याची मुलगी तथा प्रत्यक्ष साक्षीदार व तपासीक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. तोरसकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने मांजरेकर याला दोषी ठरविले आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय